आढळराव केंद्रात मंत्री होणार...कसे ते त्यांना आणि आम्हालाच माहीत : भाजप पदाधिकाऱ्याची गुगली

आढळरावांच्या त्या विधानाला युतीसह कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
shivajirao Adhalrao Patil
shivajirao Adhalrao PatilSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : केंद्रात २०२४ मध्ये पुन्हा मोदींचेच सरकार येणार, त्या सरकारमध्ये दादा तुम्ही मंत्री होणार. कसे काय ते तुम्हाला समजतंय आणि आम्हाला पण समजतंय...’ अशी गुगली भारतीय जनता पक्षाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोरच टाकली. त्यावर आढळराव-पाटलांनीही ‘युती तुटली म्हणून नाती तुटत नाहीत!’ असे म्हणत प्रतिसाद दिला. आढळरावांच्या त्या विधानाला युतीसह कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. (After upcoming 2024 elections, Shivajirao Adhlrao will become a minister in Center)

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील कार्यक्रमास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह शिवसेना, भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी अशी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची हजेरी होती. या वेळी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा पुणे बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब चव्हाण यांनी माईक हातात घेत थेट आढळराव यांच्या कौतुकाला सुरूवात केली. शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावाला फंड देणारा खासदार अशी त्यांची ओळखही सांगितली. ते सांगताना शिक्रापूरपासून तालुक्यातील अनेक गावांतील विकास निधींची जंत्रीच त्यांनी मांडली.

shivajirao Adhalrao Patil
पंढरपूर देवस्थानची धुरा प्रणिती शिंदेंकडे की सोलापूरबाहेरील युवा नेत्याकडे जाणार?

चासकमान पुनर्वसित शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नेण्यासाठी मदतीचे आवाहन करत ते म्हणाले की, ‘‘दादा, तुम्हाला ठाऊकच आहे की, २०२४ ला पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच बसणार आहेत. आगामी २०२४ ला युती होणार की नाही आम्हाला माहिती नाही. मात्र, तुम्ही २०२४ मध्ये शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार तर असणार आहातच शिवाय तुम्ही केंद्रात मंत्रीही असणार आहात. आता हे मी का म्हणतोय, हे कसं होणार, ते तुम्हालाही समजतंय आणि आम्हालाही...!’ हा सगळा जाहीर संवाद सुरू असतानाच आढळराव मात्र गालातल्या गालात हसत होते.

shivajirao Adhalrao Patil
चाणाक्ष मोहिते-पाटलांनी राष्ट्रवादीचा डाव उलटवला : बंडखोर सदस्यांचे प्रकरण पुन्हा हायकोर्टात

दरम्यान, आढळराव बोलायला उठताच त्यांनी आपण खासदार नसतानाही वाडा-डेहणे रस्त्यासाठी पाच कोटी रुपये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मंजूर करून आणल्याचे सांगत बैलगाडा शर्यतीच्या लढ्याची माहिती दिली. चव्हाण यांच्या वक्तव्याला कोट करीत, ‘युती तुटली; पण नाती तुटली नाहीत..’ असे म्हणून उपस्थित सर्व भाजप पदाधिकाऱ्यांना अपेक्षित अशा शब्दांत प्रतिसादही दिला.

आढळराव यांच्या त्या वक्तव्याला शिवसेना-भाजपसह उपस्थित कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्याही पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि संभाव्य मोठ्या राजकीय घडामोडींचा आनंदही घेतला. कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राजाभाऊ मांढरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल काशिद, पोपट शेलार, तालुकाप्रमुख सुधीर फराटे, बापू शिंदे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, उपसरपंच रमेश थोरात, माजी उपसरपंच रामभाऊ सासवडे, दत्ता गिलबिले, अनिल होळकर, समाधान डोके, कानिफ गव्हाणे व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोन उचलणारा खासदार हवा!

शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या काही दिवस अज्ञातवासात गेल्याची चर्चाही यावेळी झाली. २४ तास फोन उचलणारा, कुठल्याही प्रसंगी फोनवरही मदत करणारा, प्रतिसाद देणारा खासदार अशी आढळराव पाटील यांची ओळख होती. तीच ओळख कायम राहण्यासाठी आढळराव पुन्हा लोकसभेत हवेत, अशी कोटीही भाजप पदाधिकारी चव्हाण यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com