भाजपचा १०० पारचा नारा अन् राष्ट्रवादीचा सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार; पिंपरीत राजकारण तापलं

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तारीख दोन आठवड्यात जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी (ता.४) दिला.
Mahesh Landage, Ajit Gavhane
Mahesh Landage, Ajit Gavhanesarkarnama

पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तारीख दोन आठवड्यात जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी (ता.४) दिला. त्यावर लगेचच पहिली प्रतिक्रिया देताना पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेत 'अब की बार १०० पार'चा निर्धार असल्याचे भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे (mahesh-landge) यांनी सांगितले. तर, त्यावर भ्रष्टाचारी भाजपला सत्तेतून हद्दपार करणार असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Ncp) शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी केला. ही निवडणूक कधी होणार हे अद्याप निश्चीत झाले नसतानाही या दोन्ही माजी सत्ताधाऱ्यांत आतापासून जुंपली आहे. या दोन्ही पक्षाचे शहराध्यक्ष हे शहराच्या तीनपैकी भोसरी या एकाच विधानसभा मतदारसंघातील आहेत.

Mahesh Landage, Ajit Gavhane
फक्त पाच शहरांत की सर्व पालिका, ZP यांच्या निवडणुका लागणार? अद्याप संभ्रम कायम

अजितदादांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी सज्ज असल्याचा बिगूल गव्हाणे यांनीही न्यायालयीन निर्णयानंतर लगेचच वाजवला आहे. त्यांनीही पालिकेची निवडणूक कधीही जाहीर झाली, तरी अजितदादांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी त्यासाठी सज्ज आहे, असे सांगितले. पक्षाच्या बुथ कार्यकर्त्यापासून ते पदाधिकारी व आजी माजी नगरसेवक सज्ज आहेत. शहराला पुन्हा विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी पक्ष कटीबद्ध आहे. शहराच्या विकासाचे‘व्हिजन केवळ राष्ट्रवादीकडे असल्यामुळे शहरातील जनता भ्रष्टाचारी भाजपला सत्तेतून हद्दपार करून राष्ट्रवादीला पुन्हा एकदा संधी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Mahesh Landage, Ajit Gavhane
Breaking : निवडणुकांचा मार्ग मोकळा; दोन आठवड्यांत तारखा जाहीर होणार

गेल्या पाच वर्षांत शहराची अधोगती करणार्‍या भ्रष्टाचारी भाजपला पालिकेतील सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणाच त्यांनी दिली. ते म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराने नेहमीच राष्ट्रवादीला कौल दिला आहे. गतवेळी खोटा प्रचार करून सत्ता पदरात पाडून घेणार्‍या भाजपचा खरा चेहरा गेल्या पाच वर्षांत उघड झाला. खंडणीखोरी, लाचखोरीमुळे शहराची प्रतिमा त्यांनी मलिन केली. गेल्या निवडणुकीत भाजपने भय आणि भ्रष्टाचार मुक्तीचा नारा दिला. मात्र, कारभार भय आणि भ्रष्टाचार युक्त केला. सर्वसामान्यांच्या हक्काच्या पैशांच्या लुटीतून स्वत:ची घरे भरणार्‍या भाजप नेत्यांना यावेळी शहरवासीय धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com