Pune News : गेल्यावेळी काठावर पास झालेल्या शिरोळेंचेही टेन्शन वाढले; कसबा पॅटर्न हीट ठरणार?

Kasba by-election : कसबा पोटनिवडणुकीनंतर पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाची चर्चा होऊ लागली आहे.
Datta Bahirat, Siddharth Shirole News
Datta Bahirat, Siddharth Shirole NewsSarkarnama

Kasba by-election : कसबा पोटनिवडणुकीनंतर पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाची चर्चा होऊ लागली आहे. कसबा पॅटर्न हीट ठरला तर शिवाजीनगर मतदारसंघात भाजपला (BJP) फटका बसू शकतो, अशी चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचा निसटता विजय मिळाला. वंचित बहुजन आघाडीने शिवाजीनगरमध्ये आघाडीचे गणित बिघडवले होते. विजयासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागली होती. वंचितमुळे (Vanchit Bahujan Aghadi) भाजपला फायदा झाला होता. मात्र, राज्यातील बदलेल्या राजकीय समीकरणामुळे आणि काँग्रेसचा कसबा पोटनिवणुकीत झालेला विजय शिवाजीनगरमध्येही भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे राजकीय मंडळी सांगतात.

Datta Bahirat, Siddharth Shirole News
Satara News : कणखर उदयनराजेही गहिवरले; जनता दरबार सुरु असताना आजींची हजेरी, अन्...

भाजपला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील आठही मतदार संघात शिवसेनेची भक्कम साथ मिळाली होती. मात्र, आता शिवसेनेत पडलेली फुट आणि राज्यातील सध्याच्या राजकारणामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मिळत असलेली सहानुभूती महत्त्वाची ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षचिन्ह आणि शिवसेनेचे नाव मिळाले असलेत तरी पुण्यातील पदाधिकारी आजही ठाकरे यांच्यासोबत आहेत. हे कसबा पोटनिवडणुकीत दिसून आले आहे.

मात्र, आता राजकीय समीकरणे बदल्यामुळे शिवसेनेचा ठाकरे गट हा महाविकास आघाडी सोबत आहे. शिवाजीनगर मतदारसंघ धोक्यात असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपने काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांना पक्षात घेत, विजयाचे गणित जुळवले होते. तर वंचित बहुजन आघाडीचे अनिल कुऱ्हाडे यांनी 10 हजार 445 मते घेतली होती. त्यामुळे भाजपचा मार्ग सुकर झाला होता. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती व वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न यामुळे शिवाजीनगरमध्ये भाजपची अडचण होणार असल्याचे मतांच्या आकड्यांवरुन तरी दिसून येत आहे.

Datta Bahirat, Siddharth Shirole News
Pune News : कसब्याच्या विजयाने रमेश बागवेंच्या आशा पल्लवीत; कँटोन्मेंटमधील गणित बदलणार...?

शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचे सिद्धार्थ शिरोळे विजयी झाले होते, त्यांना 58 हजार 727 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे दत्ता बहिरट यांना 53 हजार 603 मते मिळाली होती. वंचितने दहा हजार मते घेतली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाच हजार मते मिळाली होती. वंचितने मोठ्या प्रमाणात मते घेतल्यामुळे त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसला होता. मात्र, 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचितची भूमिका काय असणार यावर पुढील गणित अवलंबून असणार आहेत. मात्र, कसबा पोटनिवडणुकीतल विजयामुळे काँग्रेसचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे कसब्याची पुनरावृत्ती शिवाजीनगरमध्ये करण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहे. आघाडीला तोंड देताना भाजपला मोठी कसरत करावी लागणार हे स्पष्ट आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com