Pune BJP : कसब्यातील पराभवानंतर भाजपात शहराध्यक्ष बदलाच्या चर्चा जोरात; पण खरंच असं होणार ?

Pune News : हक्काच्या प्रभागातील मतांचे 'लीड' कमी कसे झाले हाच संशोधनाचा विषय
Murlidhar Mohol, Jagdish Mulik, Siddharth Shirole
Murlidhar Mohol, Jagdish Mulik, Siddharth ShiroleSarkarnama

Maharashtra Politics: कसब्यातील पराभवानंतर शहर भारतीय जनता पार्टीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. बालेकिल्ला असलेला कसब्याचा बुरूज ढासळल्याने पक्षाच्या राज्य पातळीवरील नेत्यांपासून सर्वांना महापालिका व पुढच्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीची काळजी सतावू लागली आहे. कसब्यातील पराभवाची मिमांसा करण्यात येत आहे. हक्काच्या प्रभागातील मतांचे 'लीड' कमी कसे झाले हाच संशोधनाचा विषय झाला आहे. मते कमी होण्यास कारणीभूत कोण आहे? कोण कमी पडले? कुणी कामात कुचराई केली? या साऱ्याचे संशोधन पक्षाच्या पातळीवर सुरू आहे.

एका बाजूला संशोधन आणि चिंतन सुरू असताना शहर भाजपाच्या नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) शहराध्यक्ष आहेत. या निवडणुकीत आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) निवडणूकप्रमुख होत्या, तरी शहराध्यक्ष या नात्याने मुळीक यांच्याकडे जबाबदारी होती.

आमदार मिसाळ यांच्या मदतीला नगरसेवक धीरज घाटे (Dheeraj Ghate) सहनिवडणूक प्रमुख होते. माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना चिंचवड व कसब्याच्या निवडणुकीचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. तर पक्षाचे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे (Rajesh pande) यांच्याकडे व्यवस्थेची जबाबदारी होती.

Murlidhar Mohol, Jagdish Mulik, Siddharth Shirole
Adhalrao Patil News : राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराबाबत बोललो; म्हणून माझ्या गाड्या अडविणार का? आढळरावांचा सवाल

मोहोळ, मिसाळ, घाटे व मुळीक यांच्या मदतीला शहरातील मोठी टीम देण्यात आली होती. राज्यातून आलेले नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची स्वतंत्र टीम हे सर्वजण स्वतंत्रपणे काम करीत होतेच. या साऱ्यांच्या प्रयत्नांनंतर भाजपाला कसब्यात (Kasba) आलेले अपयश भाजपाच्या जिव्हारी लागले आहे. या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष मुळीक यांना बदलण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. मुळीक हे तरूण आहेत. उत्साही आहेत. मात्र, तरीही त्यांना बदलण्याची चर्चा का आणि कुणी सुरू केली हे कळायला मार्ग नाही.

मुळीक वडगाव शेरी (Wadgaon Sheri) मतदारसंघातून २०१४ निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आले. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा सपशेल पराभव झाला. त्यानंतर त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. मुळीक अध्यक्ष झाल्यानंतर कोणतीच निवडणूक झालेली नव्हती. कसब्याची निवडणूक त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील पहिलीच निवडणूक होती. मात्र, या निवडणुकीत अपयश आल्याने त्यांच्या अध्यक्षपदाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. वास्तविक या निवडणुकीत शहराध्यक्ष असलेल्या मुळीक यांच्याकडे थेट अशी कोणतीच जबाबदारी नव्हती. मात्र, पक्षाचे शहराध्यक्ष या नात्याने त्यांना जबाबदार धरण्यात येऊ लागले आहे.

Murlidhar Mohol, Jagdish Mulik, Siddharth Shirole
NCP News; `राष्ट्रवादी`च्या दणक्याने राज्य सरकार पोहोचले थेट बांधावर!

मुळीक यांना शहराध्यक्षपदावरून हटवण्याची चर्चा सुरू असली तरी ही चर्चा प्रत्यक्षात येणे अवघड असल्याचे पक्षातील काहीजण सांगत आहेत. मात्र, मुळीक यांना पर्याय म्हणून इतर काही नावांची चर्चादेखील सुरू झाली आहे. प्रामुख्याने माजी महापौर मुरलीधर मोहोळ व आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये या चर्चा जरी असल्या तरी प्रत्यक्षात काय होईल, ते पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल असे पक्षातील कार्यकर्ते सांगत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com