सोलापूरनंतर पिंपरीतही `हर हर महादेव` चा खेळ बंद पाडला!

Sambhaji Brigade : संभाजीराजे छत्रपती यांनी काल इशारा दिला होता.
Sambhaji Brigade Latest News
Sambhaji Brigade Latest NewsSarkarnama

पिंपरी : इतिहासाची मोडतोड करून चित्रपट तयार करण्यात आले, तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी काल (ता.६ नोव्हेंबर) पुण्यात दिला होता. तसेच इतिहासाचा विपर्यास करून बनविलेल्या `हर हर महादेव` आणि `वेडात मराठे वीर दौडले सात`या चित्रपटांना त्यांनी तीव्र आक्षेपही घेतला होता.

दरम्यान, त्यानंतर आज (ता.७ नोव्हेंबर) पिंपरी-चिंचवडमध्ये संभाजी ब्रिगेडने `हर हर महादेव`या सिनेमाचा खेळ बंद पाडला. (Sambhaji Brigade Latest News)

Sambhaji Brigade Latest News
अखेर सत्तारांनी जाहीर सभेत 'त्या' वक्तव्यावर केली दिलगिरी व्यक्त!

दरम्यान, शांततेने आंदोलन करीत ब्रिगेडने दुपारी एकचा हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद केला. त्यात ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे, सचिव संजय जाधव, उपाध्यक्ष जिल्हा संघटक गणेश कुंजीर, कार्याध्यक्ष प्रशांत कुंजीर, मावळ तालुका अध्यक्ष आदिनाथ मालपोटे, सहसचिव भैय्यासाहेब गजधने, जिजाऊ ब्रिगेडच्या शोभा जगताप, स्मिता म्हसकर, छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, कार्याध्यक्ष गणेश सरकटे,मराठा क्रांती मोर्चाचे जिवन बोराटे आदी सहभागी झाले होते.

मात्र,पिंपरीच्या ज्या मल्टीप्लेक्समध्ये जाऊन हा शो बंद करण्यात आला, त्या विशाल ई स्क्वेअरच्या व्यवस्थापनातर्फे पिंपरी पोलिसांत तक्रार देत नासधूस केल्याचा आरोप केल्याने पोलिसांनी आंदोलकांना पोलिस ठाण्यावर सायंकाळी बोलावून घेतले.

यासंदर्भात काळे म्हणाले, `` `हर हर महादेव`मध्ये इतिहासाची चेष्टा केली गेली असून छत्रपती शिवराय रामदासी वेशात दाखवण्याचा मूर्खपणा करण्यात आला आहे. कान्होजी जेधे खलीता घेऊन बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडे गेलेले दाखवणे म्हणजे जेधेंना शिपाई करणे आहे. बांदलं देशमुख खुळी आणि व्यभिचारी दाखवले आहेत. मराठी ह्या शब्दाचा वारंवार उपयोग केला असून पाटील म्हणजे बलात्कारी घाणेरडा दाखवला आहे.

Sambhaji Brigade Latest News
मुख्यमंत्री शिंदेंचा मंत्री-आमदारांवरील कंट्रोल सुटतोय?; 'या' वक्तव्यावरून झाली आतापर्यंत गोची...

राष्ट्रमाता या बाजीप्रभूचा सल्ला घेताना दाखवले आहे. छत्रपती यांना अफजलखानाने जिरे टोपावर वार केलेला दाखवला आहे. डोक्यातून रक्त येताना दाखवले आहे. हा तर मोठा विनोद आहे. छत्रपतीवर वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी की जो अफजलखानाचा वकील होता. त्याने छत्रपतीवर वार केलेला न दाखवता अफजलखानानेच वार केला. असं खोट दाखवले आहे.

सगळ्यात हास्यास्पद म्हणजे छत्रपतींना नरसिंहचे रूप धारण केले हे दाखवले``. तसेच ट्रेलरमध्ये मराठी शब्दांचा वापर वारंवार करण्यात आला असून मराठा साम्राज्य म्हणायची लाज वाटत होती का? संपूर्ण बारा मावळमध्ये बाजी प्रभू देशपांडे हेच एकमेव लढावू होते का..?

जेधे आणि बांदल घराण्याचे वैर होते, पण, बकरी चोरण्यावरून बांदल जेधे एकमेकांची मुंडकी मारायचे..? इतकं त्याचं विकृत स्वरूप होत का...? अफजलखानाच्या वधाच्या वेळी बाजीप्रभू तिथं होते का..? सगळ्या सरदारांची भाषा ही रांगडी मराठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा, मात्र शुद्ध मराठी हे कोणत्या आधारावर?

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध नरसिंहासारखा पोट फाडून केला...? ज्या गोष्टी प्रॅक्टिकली आणि लॉजिकली चुकीच्या आहेत त्या तुम्ही धडाधड मोठ्या पडद्यावर कशा दाखवता? यातून तुम्हाला काय साध्य करायच आहे? याची उत्तरे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी देण्याची मागणी ब्रिगेडने केली आहे.

Sambhaji Brigade Latest News
संभाजीराजेंच्या भूमिकेचा पहिला दणका; राज ठाकरेंचा आवाज असलेला चित्रपट पाडला बंद

दरम्यान, इतिहासाची मो़डतोड करून बनविण्यात आलेल्या `हर हर महादेव` मधून छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सरदार व मावळ्यांची बदनामी झाल्याने शिवप्रेमी संतप्त आहेत. म्हणून हा सिनेमा शहरात प्रदर्शित करू देऊ नये,अन्यथा आंदोलन केले जाईल, या इशाऱ्याचे निवेदन संभाजी ब्रिगेडने आज शहराचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in