पुरंदरमध्ये काँग्रेसचा एक कार्यकर्ता गृहमंत्री होवून वावरतो : शिवसेनेनंतर भाजपचाही आरोप

Shivsena | BJP | Congress : पुरंदरमध्ये काँग्रेसच्या आमदारांवर यापूर्वी शिवसेनेने गंभीर आरोप केले आहेत.
MLA Sanjay Jagtap
MLA Sanjay Jagtap Sarkarnama

सासवड : मागील काही दिवसांपासून पुरंदर तालुक्यातील राजकारणात राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेनेकडूनच काँग्रेस (Congress) पक्षांवर आणि काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. शिवसेनेचे (Shivsena) पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी सासवड आणि जेजुरी पोलीस ठाण्याच्या कारभारात संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) आणि त्यांचा एक सहकारी प्रचंड ढवळाढवळ करत आहेत, असा आरोप केला होता. त्यावर संजय जगताप यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते.

मात्र शिवसेनेच्या या आरोपानंतर भाजपनेही याच प्रकारच्या आरोपांची रिघ ओढली आहे. पुरंदर तालुक्यात गेल्या वर्षभरापासून अनेकांवर अन्याय होत आहे. प्रशासन, पोलिस यंत्रणा सर्वसामान्य लोकांचे म्हणणे ऐकूणच घेत नाही. त्यामुळे अन्याय झालेल्या लोकांच्या पाठीशी पुरंदर भाजप असणार आहे. सासवड पोलीसांच्या विरोधात आमच्या अनेक तक्रारी आहेत. तेव्हा लोकांनी भाजपाच्या नेत्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन असे भारतीय जनता पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी केले. सासवड येथे पुरंदर भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जगदाळे बोलत होते.

MLA Sanjay Jagtap
सासवड दुहेरी हत्याकांड आमदार जगतापांनी दडपलं पण कर्तबगार देशमुखांनी बाहेर काढलं

जगदाळे पुढे बोलताना म्हणाले, पुरंदर तालुक्यातील पोलीस यांत्रेवर सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा प्रचंड दबाव आहे आणि त्यातून सर्वसामान्यांच्या तक्रारी पोलीस एकूण घेत नाहीत. ज्या लोकांवर अन्याय झाला आहे. त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केला जात आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी सामन्यांच्या पाठीमागे उभी राहणार आहे. कॉंग्रेसचा एक कार्यकर्ता गृहमंत्री म्हणून पोलीस स्टेशनला वावरत आहे. सतत तालुक्यातील पोलीस स्टेशनाच्या कारभारात ढवळा ढवळ करीत आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मुलीबाळी आता सुरक्षित राहिल्या नाहीत. नुकताच सासवड मध्ये पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MLA Sanjay Jagtap
सासवड दुहेरी हत्याकांड : शिवतारे-जगतापांच्या आरोपांनंतर अभिनव देशमुखांचा मोठा निर्णय

सासवड मध्ये असलेल्या महाविद्यालयातील तरुणी आता सुरक्षित नाहीत. त्यासाठी पोलिसांनी दामिनी पथक कार्यान्वित करावे अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. या सर्वांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी करणार आहोत. यावेळी भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष गिरीश जगताप, सासवड शहराध्यक्ष साकेत जगताप, युवक नेते जालिंदर जगताप उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com