Shivsena : आढळरावांचे राष्ट्रवादी-शिवसेनेला धक्के; भोसरीत इनकमिंग

Balasahebanchi Shivsena : राष्ट्रवादी सरचिटणीसांसह ठाकरेंच्या विभागप्रमुखाचा शिंदे गटात प्रवेश
Shivajirao Adhalarao Patil
Shivajirao Adhalarao PatilSarkarnama

पिंपरी : बाळासाहेबांच्या शिवसेनेत पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात इनकमिंग सुरुच आहे. गेल्या १५ दिवसांत तीन प्रवेश सोहळे शिरूरचे माजी खासदार आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या लांडेवाडी, मंचर (ता.आंबेगाव) येथील निवासस्थानच्या जनता दरबारात झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी सरचिटणीस आणि महाराष्ट्र राज्य जनकल्याण वाहतूक सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मानसिंग जाधव आणि भोसरीतील विभागप्रमुख रामदास गाढवे, ज्येष्ठ नागरिक संघाचे साहेबराव निंबुळकर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष थोरवे यांनी नुकताच (ता.८) लांडेवाडीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Shivajirao Adhalarao Patil
BJP : उर्फीसाठी वेळ पण, माझ्यावरील अन्याय पक्षात ऐकलं जात नाही : अंधारे-चाकणकरांसमोर महिलेने मांडली व्यथा!

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे आणि भोसरी विधानसभाप्रमुख प्रा. दत्तात्रेय भालेराव यावेळी उपस्थित होते. शिरूर तालुक्यातील ३९ गावातील शेकडो महिलांनीही यावेळी शिंदे गटात प्रवेश केला. तर, पंधरा दिवसापूर्वी (२५ डिसेंबर) आढळरावांच्याच जनता दरबारात शिरूर तालुक्यातीलच १५० महिलांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. या इनकमिंगमुळे शिंदे गटाची ताकद जिल्ह्यात वाढत चालली आहे.

Shivajirao Adhalarao Patil
Shivsena : आढळराव लागले कामाला; ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम करत घडवून आणला शेकडो महिलांचा प्रवेश

दरम्यान, प्रवेशानंतर जाधव यांना लगेचच विभागप्रमुखपद (मासूळकर कॉलनी, पिंपरी-चिंचवड) आढळऱाव यांनी दिले. तर, गाढवे यांची त्यांनी भोसरी विधानसभा अंतर्गत उपशहरप्रमुखपदी नियुक्ती केली. जाधव हे २००० मध्ये पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस होते. नंतर २००६ ला आझमभाई पानसरे हे शहराध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकारिणीत ते सरचिटणीस होते.

गेली १६ वर्षे ते राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र, सर्वसामान्य कुटुंबातून येऊन मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर प्रेरित होऊन त्यांच्या पक्षात प्रवेश केला. पुन्हा राजकारणात सक्रिय झालो, असे जाधव यांनी 'सरकारनामा'शी बोलताना आज सांगितले. यापूर्वी महापालिका निवडणूक लढलेल्या जाधव यांनी आगामी ही निवडणूक मात्र लढणार नसून केवळ पक्षासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com