शिंदे साहेब, कमळीच्या नादी लागू नका!..; सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस

Eknath Shinde news| राजकारणाच्या या "हायव्होल्टेज' वातावरणात व्हॉटस्‌अप,फेसबुक, ट्‌विटरवरील भन्नाट विनोदी मीम्स, विनोदांनी अक्षरशः जान आणली.
Eknath Shinde news|
Eknath Shinde news|

पांडुरंग सरोदे

पुणे : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व नाराज आमदारांची स्वारी आपला भलामोठा फौजफाटा घेऊन मंगळवारी भल्या पहाटेच सुरतेवर चालून गेली. साहजिकच पहाटेच्यावेळी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या राजकारणाला अक्षरशः हादरे बसण्यास सुरुवात झाली. (Eknath Shinde latest News)

राजकारणाच्या या "हायव्होल्टेज' वातावरणात व्हॉटस्‌अप,फेसबुक, ट्‌विटरवरील भन्नाट विनोदी मीम्स, विनोदांनी अक्षरशः जान आणली. "शिंदे साहेब, कमलीच्या नादाला लागू नका', "गद्दारांना क्षमा नाही', "ज्या सुरतेची लुट मराठ्यांनी केली, त्याच सुरतेत तुम्ही सत्तेसाठी शरण गेलात', "मामू ला झोपेतुन उठू दे', "सिलॅबसच्या बाहेरचा पेपर मविआला आलाय वाटत' इथपासून ते "दूध,चहापावडर जास्त आणून ठेवा, राज्यपालांच्या स्टाफला सुचना', अशा भन्नाट मिम्स्‌नी मंगळवारी दिवसभर नागरीकांचे अक्षरशः मनोरंजन केले.

मंगळवारी दिवस उगवल्यापासून ते मावळतीला झुकेपर्यंत "एकनाथनाट्य' सुरु असतानाच, दुसरीकडे फेसबुक, व्हॉटस्‌अप, ट्‌विटर अशा समाजमाध्यमांवर मात्र या नाट्यावर भन्नाट मीम्स्‌, टिका-टिपण्णीपासून विनोद करण्यात आले. शिंदे यांच्या ट्‌विटरवरील संदेशानंतर "शिंदे साहेब उद्धव साहेब यांच्यानंतर तुम्हीच मुख्यमंत्री होणार होता, कमलीच्या नादाला लागू नका' असे भन्नाट पण विचार करायला लावणारे ट्‌विट एका शिवसैनिकाने केले. "बरं, मग आता काय फडणवीसांची शिकवणी लावणार का ?', देवेंद्र फडणवीस व शिंदे यांच्या एकत्रीत छायाचित्रावर "हे बघा साहेब एअरप्लेन मोडवर टाकला मोबाईल', "अरे आत्ता नको बोलू, ये अपने साईड आने वाले है नाह', एकनाथ शिंदे यांनीच पुरस्कृत केलेला "धर्मवीर' चित्रपटातील "एकनाथ कुठाय',"पुणे मुंबई पुणे' चित्रपटातील "कसला आतल्या गाठीचा आहेस रे तु' यांनी नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन केले.

याबरोबरच "जे सुरतेला जाऊन फुटतील ते मुंबईत आल्यावर सुजतील', अशा शब्दात सज्जड दमही भरण्यात आला आहे. भाजपच्या आयटी सेलवर टिका करणारे "11 मिनीटात ट्‌विटला एवढा रिस्पॉन्स फक्त आयटी सेलमुळेच येऊ शकतो' असेही ट्‌विट करण्यात आले आहे. "आत्ता बंडाळी का ? तीन वर्षे सत्तेत गाजर खात होतात का', अशा असंख्य ट्‌विट, मीम्स्‌ मंगळवारी दिवसभर फिरत होत्या. तर "दूध आणि चहा पावडर जास्त आणून ठेवा- राज्यपाल यांच्या स्टाफला सुचना' या नर्मविनोदी शैलीतील मीम्सने अक्षरशः हास्यकारंजी उडविली.

Eknath Shinde news|
Eknath Shinde Live Update : मिलिंद नार्वेकरांनाही शिंदेंनी गेटवरच ताटकळत ठेवले...

- सुरतेला काय हत्ती आणायला गेलात काय ?

शिंदे यांच्या भावनिक ट्विटनंतर एकाने गडचिरोलीतील हत्ती गुजरातमधील रिलायन्स ग्रुपच्या प्राणीसंग्रहालयात नेण्याच्या घटनेचा धागा पकडला. "मग सुरतेला काय हत्ती परत आणण्यासाठी गेलात का ?' असा प्रश्‍न त्याने ट्‌विटद्वारे केला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या भाषणातील "महाराष्ट्रामध्ये गुजराती व मराठी दुधात साखरेसारखे विरघळून गेलो आहोत' हे वाक्‍यावरी मीम्स्‌ फिरल्या.

- "योग दिवस 2022'

"सकाळ'चे व्यंगचित्रकार आलोक यांचे महाराष्ट्रातील राजकारणावर मार्मिक भाष्य करणारे "योग दिवस 2022' हे व्यंगचित्र मोठ्या प्रमाणात प्रसारीत झाले. व्हॉटस्‌अप, फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्रामपासून वेगवेगळ्या माध्यमांवर हे व्यंगचित्र गाजले. अनेकांनी ते एकमेकांना पाठवित सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष्य वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in