संभाजीराजेंपाठोपाठ आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनीही 'हर हर महादेव'ला केला विरोध!

Har Har Mahadev : हर हर महादेवच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Har Har Mahadev :
Har Har Mahadev :

पुणे : हर हर महादेव या चित्रपटावर वाद विवाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता हर हर महादेव या चित्रपटावर खुद्द बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनीच आता विरोध केला आहे. आज पत्रकार परिषद घेत बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी हर हर महादेवच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज रूपाली देशपांडे यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत, आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली.

प्रदर्शनापूर्वी आपल्याला हा चित्रपट दाखवण्यात आलेला नाही, अशी खंत बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज रूपाली देशपांडे यांनी व्यक्त केली. या चित्रपटातून अनेक व्यक्तिंचे चारित्र्यहनन करण्यात आल्याचे त्यांनी म्हंटले आहे. चित्रपटातून चुकीचे दाखले दिल्याचे आरोप त्यांनी केले आहे. याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Har Har Mahadev :
Shivsena : बाळासाहेबांच नाव वापरून गद्दारांकडून पापांवर पांघरून घालण्याचे प्रयत्न..

सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली त्यांनी चित्रपटात जे काही वेगवेगळे प्रसंग दाखवले, यावर आमचा आक्षेप आहे. जे मूळ आहे ते दाखवता आलं असतं. लिबर्टी ही काल्पनिक कथानकांमध्ये घेऊ शकतो. ऐतिहासिक कथानकांमध्ये हे चुकीचं ठरतं. चित्रपटात कथानकात उलथापालथ केलेली आहे. चित्रपटातील काही प्रसंगांना संदर्भच नाहीयेत, असे रूपाली देशपांडे म्हणाल्या.

Har Har Mahadev :
Prakash Ambedkar : मुख्यमंत्री शिंदेंनी केली आंबेडकरांशी बंद दाराआड चर्चा ; नेमकं काय शिजतयं?

दरम्यान, या चित्रपटातून शिवरायांचा इतिहासाची तोडमोड केल्याचा आरोप युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केला होता. यापाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही जोरदार विरोध दर्शवला होता. आता खुद्द बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनीच विरोध केल्याने आता या चित्रपटाच्या प्रसंगातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिनहं उमटत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in