Congress Leader Avinash Bagve
Congress Leader Avinash BagveSarkarnama

Avinash Bagve Gets Threatened: धमक्यांचे सत्र थांबेना: मोहोळ, बिडकरांनंतर आता काँग्रेस नेते अविनाश बागवेंना धमकी

Avinash Bagve gets Threatened: पुण्यात राजकीय नेत्यांना येणाऱ्या धमक्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे.

Congress- BJP Politics : पुण्यात राजकीय नेत्यांना येणाऱ्या धमक्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. माजी महापौर आणि भाजप (BJP) नेते मुरलीधर मोहोळ, गणेश बिडकर यांना धमक्यांचे फोन आले होते. ही प्रकरणे काहीशीही ताजी असतानाच आता काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनाही धमकीचे फोन येऊ लागले आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना तीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोन आला आल्याची माहिती समोर आली आहे. (After Mohol, Bidkar, now threatening call to Congress leader avinash Bagave)

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात इसमाने व्हाट्सअपद्वारे खंडणी मागत खंडणी न दिल्यास बागवे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संबंधिताने त्यांच्या मोबाईवर त्यांना मेसेज आणि फोन केला होता. या फोननंतर याप्रकरणी स्वतः अविनाश बागवे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

Congress Leader Avinash Bagve
PMPML ची मोठी कारवाई: संपकरी ठेकेदारांना ठोठावणार दंड

मंगळवारी (4 एप्रिल) दुपारी पावणे चारच्या सुमारास बागवे यांना एका अज्ञात इसमाने व्हाट्सअप वर मेसेज करून "तीस लाख रुपये दे नाहीतर तुझं पॉलिटिकल करिअर बरबाद" करू अशी धमकी दिली. तसेच , "तुला माहिती नाही आम्ही सात आठ जण आहोत. पोलिसांनी आमच्यामधील दोघांना जरी आत टाकलं तरी आम्ही तुझ्या ऑफिसच्या आणि घराबाहेर असतो." असा आणखी एक मेसेज आला. या सगळ्या प्रकरणानंतर अविनाश बागवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दरम्यान, बागवे यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्ती विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांचे सुपुत्र आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com