राष्ट्रवादी सोडताच काँग्रेसकडून मिळाली कारखान्याच्या उमेदवारीची बक्षिसी!

जिल्हा परिषदेच्या २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला धूळ चारत जिल्हा परिषद गाठली होती. त्यानंतरच्या २०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी मिळूनही त्यांचा कुलदीप कोंडे यांच्याकडून पराभव झाला होता.
ncp-congress
ncp-congresssarkarnama

नसरापूर (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) भोर तालुक्यातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव कोंडे, राजगड कारखान्याचे माजी संचालक आणि देगावचे माजी सरपंच अशोक शेलार, तसेच जिल्हा परिषदेचे माजी पशुसंवर्धन सभापती बाळकृष्ण दळवी यांनी आज काँग्रेस पक्षात (congress) प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे भोर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच शिवाजीराव कोंडे आणि अशोक शेलार यांना आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी राजगड कारखान्याची उमेदवार बहाल केली. कारखाना बिनविरोध होण्याची शक्यता असल्यामुळे कोंडे आणि शेलार यांना बिनविरोध संचालकपदी संधी मिळू शकते. (After leaving NCP, MLA Sangram Thopte gave candidature for sugar factory)

सातारा महामार्गाच्या पट्ट्यात वजनदार नेते अशी कोंडे यांची तालुक्यात ओळख आहे. त्यांनी राजगड कारखान्याचे संचालक आणि उपाध्यक्षपद म्हणून काम पाहिले आहे. जिल्हा परिषदेच्या २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला धूळ चारत जिल्हा परिषद गाठली होती. त्यानंतरच्या २०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी मिळूनही त्यांचा केळवडे गावचे तरुण उमेदवार कुलदीप कोंडे यांच्याकडून पराभव झाला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होते, मात्र कोणतेही पद नव्हते.

ncp-congress
काँग्रेस सोडणे, ही चूकच होती : राष्ट्रवादीला रामराम केलेल्या ज्येष्ठ नेत्याची कबुली

दरम्यान, आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज काँग्रेसध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे त्यांना लागलीच राजगड सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याकडे कारखान्याचे उपाध्यक्षपद देऊन या हायवे पट्ट्यात काँग्रेसची ताकद वाढविण्याची खेळी काँग्रेसकडून खेळली जाऊ शकते. कोंडे यांच्याबरोबर अशोक शेलार यांनाही राजगड साखर कारखान्याची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या दोघांची नावे काँग्रेसच्या पॅनेलमधून देण्यात आली आहेत. या पुढील काळात राजगड कारखान्यावर काम करण्याची संधी मिळाली, तर या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. आमदार थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेससाठी ते सांगतील काम करण्याची आमची तयारी आहे.

ncp-congress
संग्राम थोपटेंचा राष्ट्रवादीला मोठा धक्का : बुजूर्ग नेते शिवाजीराव कोंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भोर तालुक्यातील विरोधकांकध्ये एकवाक्यता नसल्याने राजगड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखालील कारखान्याचे पॅनेल बिनिवरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोंडे यांना पुन्हा एकदा राजगड कारखान्यावर बिनविरोध काम करण्याची संधी मिळू शकते.

ncp-congress
आम्हाला घरचं जेवण पाहिजे! राणा दाम्पत्यानं केली न्यायालयाकडं मागणी

आमदार संग्राम थोपटे यांनी प्रवेशाच्या कार्यक्रमातच शिवाजीराव कोंडे आणि अशोक शेलार या दोघांना राजगड कारखान्याची उमेदवारी देत असल्याचे सूतोवच केले होते. तसेच, ज्यांना कारखान्यावर संधी देता आली नाही, त्यांना इतर संस्थांवर संधी देण्यात येईल, असा मी शब्द देतो, असेही आमदार थोपटे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com