विश्वजीत कदमांचे सासरे अडचणीत! ईडीनंतर आता अडकले सीबीआयच्या फेऱ्यात

अविनाश भोसले हे ईडीनंतर आता सीबीआयच्या रडारवर
Builder Avinash Bhosale
Builder Avinash BhosaleSarkarnama

पुणे : पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) गेल्या वर्षी दणका दिला होता. भोसले यांची चार कोटी रुपये किमतीची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील गणेशखिडमध्ये असलेल्या त्यांच्या एबीआयएल कंपनीच्या मुख्यालयावर ईडीने ही कारवाई केली होती. आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) त्यांच्यावर छापे टाकले आहेत. राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांचे अविनाश भोसले हे सासरे आहेत.

उद्योगपती अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर आज सीबीआयने छापे टाकले आहे. पुण्यातील एबीआयएल कार्यालयावर आज सकाळी सीबीआयकडून छापा टाकण्यात आला. येस बँक आणि डीएचएफएल गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई सुरू आहे. सीबीआयने आज मुंबई आणि पुण्यात 8 ठिकाणी छापे मारले आहेत. शाहीद बलवा आणि अविनाश भोसले यांच्यावर हे छापे टाकण्यात आले. येस बँक आणि डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात संजय छाबरिया यांना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. सध्या ते सीबीआयच्या कोठडीत आहेत. यानंतर सीबीआयच्या कारवाईला वेग आला आहे.

Builder Avinash Bhosale
‘राज’कारण तापलं अन् नार्वेकरांच्या हट्टापायी महत्वाची बैठक सोडून आदित्य ठाकरे दक्षिणेत

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भोसले यांची चार कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. त्याआधीही भोसले यांची कोट्यवधींची मालमता ईडीने जप्त केली होती. ईडीने गेल्या वर्षी 21 जूनला भोसलेंची 40 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ईडीकडून मागील वर्षापासून भोसले यांची चौकशी सुरू होती. कर चुकवेगिरीप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला होता. ईडीने भोसले यांच्या पुणे आणि मुंबई येथील मालमत्तांवरही छापेही टाकले होते. 

Builder Avinash Bhosale
राज ठाकरेंचं पुण्यात शाही स्वागत! शंभर पुरोहितांचं मंत्रपठण अन् फुलांचा वर्षाव

भोसले यांची ईडीने गेल्या वर्षी 11 फेब्रुवारीला तब्बल आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. परकीय चलनाविषयीच्या `फेमा` कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करण्यात आली होती. भोसले यांचा पुण्यात आणि मुंबईत बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. तसेच, देशभर त्यांची कंपनी पायाभूत क्षेत्रात काम करते. ईडीच्या नजरेत त्यांचे कोणते व्यवहार आले, याचा खुलासा नंतरच होण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या कंपनीचे पुण्यात मुख्यालय आहे. तेथे ईडीने छापा मारला होता. पुण्यात कधी काळी रिक्षा चालविणारे अनिनाश भोसले हे मोठे बांधकाम व्यावसायिक झाल्याने त्यांच्याबद्दलच्या `सक्सेस स्टोरीज`ही सोशल मिडियात व्हायरल होत असतात. मात्र, त्यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्याने खळबळ उडाली होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com