Chinchwad By-Election : अजित पवारांकडून 'फुगीर बेडूक' उल्लेख झाल्यानंतर कलाटेंचाही पलटवार, म्हणाले..

Ajit Pawar : "चिंचवडची जनताच अंतिम निर्णय देईल."
Ajit Pawar | Rahul Kalate
Ajit Pawar | Rahul KalateSarkarnama

Chinchwad By-Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचारसभा दरम्यान विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी बंडखोर शिवसेनेशी बंड केलेल्या अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर बरसून टीका केली होती. अजित पवार यांनी कलाटेंना फुगीर बेडक अशी उपमा दिली होती. पवारांच्या या टिकेवर आता कलाटेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “चिंचवडचे मतदारच मला विजयी करून अजित पवारांना उत्तर देतील. त्यांनी माझ्यावर बोलण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर बोलायला हवे होते. असे राहुल कलाटेंनी उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे व महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी दोनच दिवसांपूर्वी प्रचारसभा पार पडली होती. यावेळी अजित पवार यांनी कलाटेंवर जोरदार टीका केली होती. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे मंचावर होते.

Ajit Pawar | Rahul Kalate
Bhagatsingh Koshyari : 'कोश्यारींनी ठाकरे परिवाराशी जुळवून घेण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला!'

अजित पवारांनी केलेल्या टिकेवर प्रत्युत्तर देत कलाटे म्हणाले की, "अजित पवारांनी नेमकं काय म्हंटलं, हे मी ऐकलं नाही. मात्र चिंचवडची जनता यावेळी शिट्टी (कलाटेंचे निवडणूक चिन्ह) वाजवणार हे निश्चित. यामुळे त्यांना राग आला असावा, पवारांवर माझ्यासारख्याने बोलणं बरोबर नाही, अजित पवार खूप मोठे नेते आहेत. चिंचवड मधील जनतेला अपेक्षा आहे की, पवारांनी इथल्या स्थानिक प्रश्नावर बोलायला हवे, असे कलाटे म्हणाले.

Ajit Pawar | Rahul Kalate
Congress News : "आम्ही चव्हाणांना जबरदस्ती करू..." ; केदारांचं वक्तव्य : प्रदेशाध्यक्षापदावरून काँग्रेस घमासान?

दरम्यान कलाटेंनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांनी माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी माघार न घेता बंडाचा झेंडा फडकवला होता. यामुळे चिंचवडच्या निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. बंडखोरी केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने नुकतीच त्यांच्यावर कारवाई करून, त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com