महापालिकेत शेवटच्या दिवशी रंगणार राजकीय कुरघोड्यांचा डाव

Pune Municipal Corporation महापालिकेवर १५ मार्च पासून आयुक्त विक्रमकुमार हे प्रशासक म्हणून कामकाज सांभाळणार आहेत.
pune municipal corporation
pune municipal corporation sarkarnama

पुणे : पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) सभागृहाची सोमवार (ता. १४) अखेरचा दिवस असणार आहे. निवडणुका (Election) होईपर्यंत मंगळवारपासून महापालिकेत प्रशासकराज (Administrator) सुरू होणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी महापालिकेची निरोपाची ऑनलाइन सभा होणार आहे. या शेवटच्या सभेत एकमेकांवर कुरघोड्या, पाच वर्षाच्या कारभाराचा मागोवा घेतानाच सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता असल्याने याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कोरोना आणि ओबीसी आरक्षणामुळे (OBC reservation) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे गेले आहे. पुणे महापालिकेसाठी तीन सदस्यांच्या प्रभाग निश्चित झाला आहे. या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर होऊन त्यावर हरकती सूचना मागविण्यात आल्या. त्याची सुनावणी होऊन प्रारूप आराखड्यात आवश्‍यक असलेल्या बदलांचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे अंतिम आराखडा जाहीर करून आरक्षणाची सोडत जाहीर करणे ही प्रक्रिया अद्याप शिल्लक आहे. त्यातच राज्य शासनाने विधिमंडळात नवीन कायदा पारित करून निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे या निवडणुका किमान सहा महिने पुढे जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

pune municipal corporation
फडणवीसांना अटक केल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटेल : हर्षवर्धन पाटलांचा गंभीर इशारा

मार्च २०१७ मध्ये अस्तित्वात आलेल्या महापालिकेच्या सभागृहाची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपणार आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक (Corporator) आपोआप माजी नगरसेवक होणार आहेत. महापालिकेवर १५ मार्च पासून आयुक्त विक्रमकुमार हे प्रशासक म्हणून कामकाज सांभाळणार आहेत. पुणे महापालिकेच्या इतिहासात अशाप्रकारे प्रथमच प्रशासक येणार असल्याने त्यांच्या कामकाजाची पद्धत कशी असणार याबाबतची उत्सुकता निर्माण झालेली आहे.

सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता स्थायी समितीची अंदाजपत्रकाची बैठक आहे. यामध्ये भाजपकडून (BJP) उपसूचना मांडून त्यांना आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात हवे ते बदल करून घेतले जाण्याची शक्यता आहे. मात्र, आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात बदल करता येत नाहीत. त्यासाठी मुख्यसभेची मान्यता घ्यावी लागते, असा पवित्रा विरोधकांनी घेतलेले आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत वाद होण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजता ऑनलाईन मुख्यसभा होणार आहे. यामुख्यसभेत महत्त्वाचे विषय नाही. मात्र, सभेत गेल्या पाच वर्षाचा मागोवा घेणारी भाषणे, व भावनिक भाषणे होण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून प्रशासक कारभार सांभाळणार आहेत. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालय, गाड्या व इतर सुविधा काढून घेतल्या जातील. त्याबाबतही प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे.

pune municipal corporation
गिरीश महाजनांनी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव

स्थायी समितीत मध्ये काय होणार?

स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे. याचवेळी भाजपकडून स्थायी समिती बरखास्त होऊ शकत नाही, त्यामुळे अध्यक्ष हेमंत रासने हेच पुढील वर्षाचे अंदाजपत्रक मांडणार असे सांगत आहे. त्यास विरोधीपक्षांनी विरोध केला आहे. उद्याच्या बैठकीत अंदाजपत्रकावर उपसूचना देऊन त्यात बदल करायचे प्रस्ताव भाजपकडून केले जाऊ शकणार आहे. तर प्रशासनाने राज्य शासनाकडे भाजपच्या दाव्याबाबत खुलासा मागतिलेला असून, त्यावर उत्तर न मिळाल्यास प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

''महापालिकेच्या शेवटच्या दिवशी मुख्यसभा व स्थायी समितीची बैठक आहे. तसेच मंगळवारपासून प्रशासक लागणार असल्याने पुढील कार्यवाही कशी करायची याबद्दल आयुक्तांशी चर्चा केली जाईल,'' असे नगरसचिव शिवाजी दौंडकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com