Aditya Thackeray News : पुण्यातील वेताळ टेकडीसाठी आदित्य ठाकरे मैदानात; म्हणाले टेकडीचा बळी...

Pune News : वेताळ टेकडी वरुन पुण्यात अनेक दिवसांपासून राजकारण तापले आहे.
Aditya Thackeray News
Aditya Thackeray NewsSarkarnama

Aditya Thackeray Pune News : वेताळ टेकडी वरुन पुण्यात अनेक दिवसांपासून राजकारण तापले आहे. वेताळ टेकडी बचाव कृती समितीने टेकडीवरील प्रकल्प रद्द करून टेकडीला नैसर्गिक वारसास्थळ, ना विकास क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची मागणी केली. याच संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज वेताळ टेकडीला भेट देऊन पाहणी केली.

या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, ''पुण्यातील 'मिनी सह्याद्री' म्हणून ओळख असलेल्या वेताळ टेकडीस आज भेट दिली. विकासाच्या नावाखाली जैवविविधतेने संपन्न असलेल्या या टेकडीचाही बळी देण्याचा घाट पुणे (PUNE) महानगरपालिकेने घातला आहे,'' असा आरोप त्यांनी केला.

Aditya Thackeray News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंचा विषय एका वाक्यात संपावला; म्हणाले...

''येथील स्थानिकांचा तसेच पर्यावरणस्नेही संस्थांचा याला विरोध असून या प्रकरणी लक्ष घालून टेकडी वाचवण्यासाठी आपण नककीच प्रयत्न करू,'' असे आश्वासन आदित्य ठाकरे यांना दिले. यावेळी त्यांनी अनेक नागरिकांशी संवाद साधत टेकडीची पाहणी केली.

दरम्यान, बालभारती-पौड फाटा रस्ता, पंचवटी सुतारदरा गोखलेनगर बोगदा प्रकल्प आणि एससीएमटीआर या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याचा दावा केला जात आहे. पुणे महापालिकेने कोणतेही वैज्ञानिक मूल्यांकन न करता हे प्रकल्प पुण्याच्या विकास आराखड्यात समाविष्ट केले, असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. तसेच या प्रकल्पांची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही, असा दावाही समितीने केला आहे.

Aditya Thackeray News
Sanjay Shirsat On Sharad Pawar : पवारांनी राजीनाम्याची गुगली टाकत अनेकांचा `करेक्ट कार्यक्रम` केला..

बालभारती-पौड फाटा रस्त्याची गरज सिद्ध होत नसताना महापालिका तीनशे कोटी रुपयांची निविदा काढून प्रकल्प पूर्ण का करत आहे? असा सवाल वेताळ टेकडी बजाव कृती समितीने केले आहेत. टेकडीला घातक असणारा कोणताही निर्णय घेण्याआधी नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी कृती समितीची भूमिका आहे. आज आदित्य ठाकरे यांनी पाहणी करुन कृती समितीला आश्वासन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com