'एका महिन्यानंतर हे बेईमान सरकार कोसळणारच!'

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची बंडखोर आमदारांवर टीका
Tourism Minister Aditya Thackeray
Tourism Minister Aditya ThackeraySarkarnama

पुणे : ही लढाई सरकारची नाही, सत्तेसाठीच्या राक्षसी महत्वाकांक्षेची आहे. या राज्यात दोन लोकांचे जम्बो मंत्रिमंडळ आहे. 33 व्या दिवशी त्यांना तिसरा माणूस मिळाला नाही, असा हल्लाबोल शिवसेनेचे (ShivSena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर केला.

शिव संवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे यांची आज पुण्यातील कात्रच चौकात सभा होती. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. या दोघात खरा मुख्यमंत्री कोण हे त्यांना ही कळले नाही. एका महिन्यानंतर हे बेईमान सरकार कोसळणारच, असा निशाणा आदित्य ठाकरे यांनी साधला. असे सरकार महाराष्ट्रात टिकणार नाही. गद्दार, संधी साधू महाराष्ट्रात जागा नाही, अशी टिकाही आदित्य यांनी केली.

Tourism Minister Aditya Thackeray
उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला : आदित्य यांच्या सभेनंतर पुण्यात शिवसैनिक आक्रमक

गेल्या अडीच वर्षात जे उद्धव साहेबांचे (Uddhav Thackeray) काम आहे. त्यामुळे लोकांचा जनसागर माझ्या मागे उभा राहत आहे. राज्यात पूर परिस्थिती असताना आपले दोन लोकांचे सरकार नेहमी दिल्लीला जात आहे. दिल्लीश्वर विचारत नाही त्यामुळे माझ्यानंतर हे लोक दौरे सुरु करत आहेत. हे दोन लोक फक्त खालच्या पातळीच्या राजकारणाचा विचार करतात, असेही आदित्य म्हणाले.

Tourism Minister Aditya Thackeray
आदित्य ठाकरेंचा शिंदेवर थेट निशाणा; आज काही गद्दार पुणे जिल्ह्यात फिरले...

महाराष्ट्रात गद्दारांच खोटारड राजकारण मान्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. मी वयाचे भान ठेऊन बोलतो. मला आक्रमकपणा दाखवायला लावू नका, असा थेट इशाराही आदित्य यांनी दिला. गद्दार आमदार आणि खासदारांना जनमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणूकीला समोर जा. एकदा होऊन जाऊदे, शिंदे गटाच्या आमदार-खासदारांना आदित्य ठाकरेनी चॅलेंज दिले. दिल्लीने तुम्हाला नाकारले आहे. आत्तापर्यंतजे तुमचे होते ते शिवसेनेच्या भगवा ध्वज आणि उद्धव साहेबांमुळे होते. आता यांनी माणुसकीची गद्दारी केली आहे. गद्दार आमदार-खासदर दिवाळीमध्ये घरी येऊन जेऊन गेले होते. त्यावेळेसच उद्धव ठाकरेचे पाहिले ऑपरेशन झाले.

Tourism Minister Aditya Thackeray
मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली तर आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेपेक्षा पन्नास पट जास्त गर्दी दाखवेलं...

त्यावेळेस परदेशात मी पर्यावरणावरील कॉन्फरन्सला गेलो होतो. तातडीने त्यांचे दुसरे ऑपरेशन ही झाले. त्यावेळेस उद्धव साहेब शरीराची हालचाल करू शकत नव्हते. सोशल मीडियाच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठक घेत होते. कोविड रोखण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदारांची बैठक घेत होते. याकाळात या गद्दारांनी महाराष्ट्राची सेवा करण अपेक्षित होते. पण यांनी आमदार फोडायला सुरुवात केली. त्यावेळी स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी कट रचायला सुरुवात केली, असेही ते म्हणाले. ज्या माणसाने तुम्हाला सर्व काही दिले. त्यामाणसासोबत गद्दारी करण्यासाठी यांनी राजकारण सुरु केले. जेंव्हा उद्धव साहेबांना कोविड झाला तेंव्हा हे डरफोक सुरतेला पळून गेले, असा हल्लाबोल आदित्य यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in