आदित्य ठाकरेंचा शिंदेवर थेट निशाणा; आज काही गद्दार पुणे जिल्ह्यात फिरले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेचे (ShivSena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) एकाच वेळी पुणे दौऱ्यावर होते.
Shivsena Leader Aditya Thackeray Latest News
Shivsena Leader Aditya Thackeray Latest NewsSarkarnama

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेचे (ShivSena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) एकाच वेळी पुणे दौऱ्यावर होते. आदित्य यांनी कात्रय येथील सभेत बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. आज काही गद्दार जिल्ह्यात फिरत आहेत, असा निशाणा त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर साधला.

कात्रजमध्ये बोलत असताना आदित्य ठाकरे म्हणाले, व्यासपिठावर जाताना कार्यकर्त्यांनी आदित्य यांना गराडा घालत, हातात हात देण्याचा प्रयत्न केला. आदित्य यांनीही प्रत्येकाचे समाधान करण्याचा प्रयत्न करत हातात हात देत होते. इथे येताना गर्दीमुळे धक्काबुक्की झाली. याबर बोलताना आदित्य म्हणाले. मला वाटले कोणी माझा हात नेते की काय पण या हातांनी धनुष्यबाण पकडले आहे. गद्दारांना उत्तर देण्याची त्यांची लायकी नाही, असा घणाघात त्यांनी केला. आज काही गद्दार पुण्यात फिरत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

Shivsena Leader Aditya Thackeray Latest News
उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला : आदित्य यांच्या सभेनंतर पुण्यात शिवसैनिक आक्रमक

फंड मिळाले नाही म्हणून आरोप केले पण अजितदादांनी विधान मंडळात सर्वांची चिरफाड केली. आदित्य ब्ल्यू शर्ट घालतो म्हणून बाहेर पडलो, असे म्हणायला गद्दार मागे पुढे पाहणार नाहीत. काय कमी दिल आम्ही यांना. त्यावेळेस निर्लज्ज गद्दार टेबलावर उड्या मारून नाचत एकमेकांना पेढे भरवत होते. हे गद्दारच आहेत. जे स्वतःच्या परिवाराचे नाही झाले. हे जनतेचे काय होणार, असा हल्लाबोल त्यांनी केला.

उद्या इथे कांही बिघडल तर हे दिल्ली आणि गुवाहटीला पळून जातील. वार करायचेच होते तर छातीवार करायला पाहिजे होते. पाठीवर काय करताय बेडकांसारख्या उड्या मारत 40 गद्दार आमदार पलीकडे गेलेले आहेत. राज्यपालांनी सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर टीका कोली होती. आता ते मराठी माणसावर बोलत आहेत. मराठी माणसांना बाजूला पाडण्यासाठी हे राज्यपाल असे कृत्य करत आहेत. महाराष्ट्राचे पाच तुकडे करण्यासाठी राज्यपालांची अशी वक्तव्य चालू आहेत. ठाकरे परिवाराला एकटे पाडू शकत नाही, कारण महाराष्ट्राची जनता हेच सर्व ठाकरे परिवार आहे.

गद्दार आमदार आणि खासदारांना जनमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणूकीला समोर जा. एकदा होऊन जाऊदे, शिंदे गटाच्या आमदार-खासदारांना आदित्य ठाकरेनी चॅलेंज दिले. दिल्लीने तुम्हाला नाकारले आहे. आत्तापर्यंतजे तुमचे होत ते शिवसेना, भगवा ध्वज आणि उद्धव साहेबांमुळे होते. आता यांनी माणुसकीची गद्दारी केली आहे. गद्दार आमदार-खासदर दिवाळीमध्ये घरी येऊन जेऊन गेले होते. त्यावेळेसच उद्धव ठाकरेचे पाहिले ऑपरेशन झाले. त्यावेळेस परदेशात मी पर्यावरणावरील कॉन्फरन्सला गेलो होतो. तातडीने त्यांचे दुसरे ऑपरेशन ही झाले. त्यावेळेस उद्धव साहेब शरीराची हालचाल करू शकत नव्हते. सोशल मीडियाच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठक घेत होते.

Shivsena Leader Aditya Thackeray Latest News
मुख्यमंत्र्यांनी घरी येण्याचे निमंत्रण स्वीकारताच तानाजी सावंत म्हणाले, कोण आदित्य ठाकरे?

कोविड रोखण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदारांची बैठक घेत होते. याकाळात या गद्दारांनी महाराष्ट्राची सेवा करण अपेक्षित होते. पण यांनी आमदार फोडायला सुरुवात केली. त्यावेळी स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी कट रचायला सुरुवात केली, असेही ते म्हणाले. ज्या माणसाने तुम्हाला सर्व कांही दिले. त्यामाणसासोबत गद्दारी करण्यासाठी यांनी राजकारण सुरु केले. जेंव्हा उद्धव साहेबांना कोविड झाला तेंव्हा हे डरफोक सुरतेला पळून गेले, असा हल्लाबोल आदित्य यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com