आढळरावांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर

‘त्या वेळी राजकीय चर्चा झाली, काही छापू नका,’ असे सावंत पाटील यांनी त्यावेळी पत्रकारांना सांगून चर्चेला विराम दिला होता.
Balasaheb Sawant Patil
Balasaheb Sawant Patil Sarkarnama

मंचर (जि. पुणे) : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांचे खंदे समर्थक आणि शिवसेनेचे बाळासाहेब उर्फ भाऊसाहेब सावंत पाटील (Balasaheb Sawant Patil) यांनी रविवारी (ता. ३० ऑक्टोबर) माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. सावंत पाटील यांचा लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) गृहप्रवेश होणार असल्याच्या चर्चेला आंबेगाव तालुक्यात उधाण आले आहे. (Adhalrao's supporter Balasaheb Sawant Patil on the way of ncp)

सन २००४ पासून आत्तापर्यंत झालेल्या सर्व लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये आढळराव पाटील यांच्यासमवेत सावंत पाटील प्रमुख कार्यकर्ते म्हणून सोबत होते. पण, गेली दोन महिने सावंत पाटील यांची आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर जवळीक वाढली आहे. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांच्यासमवेत त्यांचा वावरही वाढला आहे. महिनाभरापूर्वी अनेक कार्यकर्त्यांसमवेत सावंत पाटील यांनी वळसे पाटील यांची भीमाशंकर कारखान्यावर भेट घेऊन चर्चा केली होती. पण, ‘त्या वेळी राजकीय चर्चा झाली, काही छापू नका,’ असे सावंत पाटील यांनी त्यावेळी पत्रकारांना सांगून चर्चेला विराम दिला होता.

Balasaheb Sawant Patil
मोहोळमधून संधी मिळाली नसती, तर आज मी माळशिरसचा आमदार असतो : राष्ट्रवादी आमदार मानेंचा गौप्यस्फोट

गेल्या आठवड्यात त्यांचे बंधू रमेश सावंत पाटील यांना आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी उद्योग व्यापार विभागाचे अध्यक्षपद नियुक्तीचे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुणे येथे देण्यात आले. त्यावेळी तेथे बाळासाहेब सावंत पाटील हजर नव्हते. बाळासाहेब सावंत व रमेश सावंत हे दोन्ही बंधू पारगावतर्फे खेड या गावातील काही प्रमुख कार्यकर्त्यासह भीमाशंकर कारखान्यावर रविवारी (ता. ३० ऑक्टोबर) आले. त्यावेळी त्यांना पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्तेही चकित झाले. वळसे पाटील यांनी आनंदाने शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर बाळासाहेब सावंत पाटील यांचे स्वागत शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व दादाभाऊ पोखरकर यांनी केले.

Balasaheb Sawant Patil
बारामतीच्या माळेगावात विषारी ताडी प्यायल्याने दोन तरुणांचा मृत्यू

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत भाऊसाहेब सावंत यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे, असे आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी सांगितले.

Balasaheb Sawant Patil
रणजितदादांच्या मंत्रिपदासाठी वकिली करू; भाजपमध्येही आमचे ऐकणारे आहेत : राजन पाटलांचे मोठे वक्तव्य

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com