Shivajirao Adhalarao Patil : राष्ट्रवादीला झालंय काय; माजी खासदार आढळरावांना पडला प्रश्न !

Shivajirao Adhalarao Patil : अजित पवारांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातून संतापाच्या भावना समोर येत आहेत.
Shivajirao Adhalarao Patil, Ajit Pawar
Shivajirao Adhalarao Patil, Ajit PawarSarkarnama

Shivajirao Adhalarao Patil : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची पुण्यात भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली, अशी माहिती आढळराव यांनी दिली. या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यावर निशाना साधला.

Shivajirao Adhalarao Patil, Ajit Pawar
Aurangabad : सत्तारांचा निशाणा शिरसाटांवर ? पण ते काहीच बोलेना..

हिवाळी अधिवेशन चालू असताना शेवटच्या दिवशी अजित पवार म्हणाले होते की, “छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते, ते धर्मवीर नव्हते. शेकडो वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर मानल जातं पण आता अचानक असे विषय काढले जातात. राष्ट्रवादीला काय झालंय ते कळत नाही. तर त्यांनी भाऊ तोरसेकर यांच एक वाक्य सांगितलं ते म्हणाले की राष्ट्रवादी हा जिहादी पक्ष आहे. आता याबाबत महाराष्ट्राने ठरवावे.”

त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातून संतापाच्या भावना अनेक भागांमधून समोर येत आहेत. “अजित पवारांनी जे वक्तव्य केलं, ते कुठलाही अभ्यासपूर्ण न करता केलेला आहे. चर्चेत राहण्यासाठी  असेल किंवा त्यांची पवार स्टाईल आहे, जे विधान त्यांनी धरणावर केलं तसंच हे विधान आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या बद्दल मला काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही. त्यांनी कुठेही जावं त्याचा आपल्याला काही फरक पडत नाही.

Shivajirao Adhalarao Patil, Ajit Pawar
Shahajibapu Patil : काय ते वर्क आऊट, काय ते डाएट.., एका आठवड्यात ९ किलो वजन घटवलं; शहाजीबापूंचा नवा लूक

“शिंदे- फडणवीस सरकार फार काळ सत्तेत राहू शकणार नाही. हे सरकार लवकरचं पडणार आहे,” असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्याला आढळराव यांनी उत्तर दिले आहे.

2024 ची लोकसभा निवडणूक भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र लढणार आणि जिंकणार. तुम्ही बघा २०२४ मध्ये काय होणार ते. संजय राऊतांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी त्यांच्या बोलण्याचा अर्थ सिरीयसली घेतला आणि पचतावलो. यापुढे देखील संजय राऊत असाच आरडा ओरडा करत राहणार. परंतू मला संधी मिळाली तर मी लोकसभा निवडणूक लढवणारच आहे, असे आढळराव यावेळी बोलतांना म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in