शिवसेनेचा पदाधिकारी अडचणीत! अभिनेत्रीच्या जमिनीत घुसखोरी पडली महागात

अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जमिनीत बेकायदा खोदाई
Usha Chavan Kadu
Usha Chavan Kadu Sarkarnama

पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण (Usha Chavan) यांच्या जांभळी येथील शेतजमिनीत बेकायदा घुसून तेथे शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्याने खोदाई केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह दोघांविरुद्ध उत्तमनगर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांचा समावेश आहे.

याप्रकरणी उषा चव्हाण-कडू यांचे पुत्र ह्दयनाथ दत्तात्रय कडू यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. उषा चव्हाण यांनी 1999 मध्ये हवेली तालुक्‍यातील जांभळी येथे गट साडेसहा एकर जमीन खरेदी केली होती. या जागेवर त्यांच्या कुटुंबातील सदस्य वेळोवेळी पाहणी करुन देखभाल करतात. तसेच, त्यांनी धर्मराज शिवाजी गडदे (वय 33, रा. जांभळी) यांना त्यांच्या जागेतील माळरानावर गायी चारण्यासही परवानगी दिली आहे.

Usha Chavan Kadu
अंकुश काकडेंनी मला मारायला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाठवले; भाजपच्या आंबेकरांचा गौप्यस्फोट

या जमिनीतून लवाहिनी टाकण्यासाठी चर खोदण्याबाबत राजेंद्र धनकुडे यांनी फिर्यादीकडे विचारणा केली होती. त्याला फिर्यादी यांनी विरोध केला होता. जलवाहिनी रस्त्याच्या कडेने करण्याची सूचना त्यांनी केली होती. तरीही या जमिनीवरजेसीबी आणून खोदाई सुरु करण्यात आली. याची माहिती गडदे यांनी फिर्यादी आणि त्याच्या आईला दिली. ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे जमिनीमध्ये खोदकाम केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत उत्तमनगर पोलिसांना माहिती दिली.

Usha Chavan Kadu
स्मृती इराणींच्या विरोधात आंदोलन महागात! रुपाली पाटलांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता जमिनीत 400 फूर लांब, चार फूट रुंद व दोन फूट खोल चर खोदल्याचे आढळले. तसेच त्यांनी वहिवाटीसाठी केलेला रस्ताही उकरुन बंद केल्याचे दिसले. याबरोबरच त्यांच्या जागेतील दगडाच्या ताली, लोखंडी तारेके कुंपण, सिमेंट व लोखंडाच्या खांबांची तोडफोड केल्याचे आढळले. धनकुडे यांनी फिर्यादीची परवानगी न घेता, त्यांच्या जागेत घुसून चर खोदल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com