Police complaint against Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेदच्या अडचणी वाढणार? पुण्यात तक्रार दाखल

Urfi Javed News : उर्फी जावेदच्या बोल्ड फॅशनमुळे चित्रा वाघ आक्रमक
Urfi Javed
Urfi JavedSarkarnama

Urfi Javed News : अभिनेत्री ऊर्फी जावेद तिच्या बोल्ड फॅशनमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिच्या या वागण्यामुळे भाजप महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. तर आता उर्फी जावेदच्याविरोधात पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अर्चीता जोशी यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात उर्फी जावेदवर सायबर अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली आहे. त्यामुळे ऊर्फी जावेदच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Urfi Javed
Urfi Javed Case : चित्रा वाघ संतापल्या; उर्फीविरोधात थेट पोलीस आयुक्तांकडेच केली तक्रार...

ऊर्फी जावेद नेहमी वेगवेगळ्या फॅशनमुळे चर्चेत असते. मात्र आता उर्फी जावेद कपड्यामुळेच वादात सापडली आहे. उर्फी जावेदच्या कपड्यावरून चित्रा वाघ या देखील चांगल्याच आक्रमक झाल्यात. चित्रा वाघ यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती.

Urfi Javed
Mahesh Landge : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच, धर्मवीर की धर्मरक्षक वादात महेश लांडगेंचीही उडी

दरम्यान, उर्फी जावेद विषयी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, ''एकीकडे निष्पाप महिला विकृतांच्या शिकार होत आहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतीये'', असं ट्वीट त्यांनी केलं होतं. यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्यावतीने उर्फी जावेदवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आलीय. त्यामुळे उर्फी जावेद अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com