माझ्यावर RSSचे संस्कार, मी विक्रम गोखलेंवर बोलणार नाही!

''परखडपणे आणि स्पष्टपणे बोलता आले पाहिजे. आपला विचार आग्रहाने मांडता आला पाहिजे. आज मी इथे विक्रम गोखलेंवर बोलणार नाही,'' असे सोमण (Yogesh Soman) म्हणाले.

माझ्यावर RSSचे संस्कार, मी विक्रम गोखलेंवर बोलणार नाही!
Yogesh Soman,Kangana Ranaut,Vikram Gokhalesarkarnama

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी अभिनेत्री कंगना राणावतच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याला समर्थन दिले. त्यानंतर त्यांना विरोध करणारे आणि त्यांना समर्थन करणाऱ्यामध्ये वाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेते योगेश सोमण (Yogesh Soman) यांनी यावर बोलणं टाळलं. सोमण पुण्यात एका कार्यक्रमात उपस्थित होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेत 'फुलोरा' काव्यसंग्रहाच्या प्रकाशन झाले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या साहित्य आघाडीच्या वतीने या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सोमण बोलत होते. ''परखडपणे आणि स्पष्टपणे बोलता आले पाहिजे. आपला विचार आग्रहाने मांडता आला पाहिजे. आज मी इथे विक्रम गोखलेंवर बोलणार नाही,'' असे सोमण (Yogesh Soman) म्हणाले.

योगेश सोमण म्हणाले, ''माझ्या पाठीमागे जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनेचा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आहे. मी अंधभक्त नाही, रॅशनल विचार करतो. तो मांडतोही. एखाद्या गोष्टींमागची कारणमीमांसा करता आली पाहिजे.''

Yogesh Soman,Kangana Ranaut,Vikram Gokhale
शाहरुख-आर्यन माझं काहीही वाकडं करु शकणार नाही : विक्रम गोखले

आपल्या बेताल विधानामुळे अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) प्रसिद्ध आहे. तिनं नुकतेच भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यावरुन जे वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन देशभर संताप व्यक्त केला जात आहे. अभिनेते विक्रम गोखले वगळता अनेकांनी तिच्या या विधानावरुन तिच्यावर हल्लाबोल केला आहे. राखी सावंत हीने याबाबत कंगनाला चांगलेच सुनावलं आहे. राखी सावंत हीनं व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर सध्या समाजमाध्यमांवर चर्चा सुरु आहे.

'१९४७ साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे,' असे विधान अभिनेत्री कंगना राणावत हिनं केलं आहे. तिच्या या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही तिच्या या विधानानाचा समाचार घेतला आहे. विक्रम गोखले यांनी मात्र, कंगनाच्या विधानाचे समर्थन केलं आहे. विक्रम गोखले म्हणाले, ''कंगना जे म्हणाली ते खरंय, मी तिच्या वक्तव्याचे समर्थन करतो,'' यावेळी गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची स्तृती केली.

राखी सावंत (Rakhi Sawant) हिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने असे म्हटले की, तिला कंगनाच्या या वादग्रस्त विधानामुळे धक्का बसल्याने थेट रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. याबद्दलचा एक व्हिडिओ सुद्धा तिने शेअर केला आहे. राखी सावंत हिने असे म्हटले की, मी रुग्णालयात असून नर्स माझे चेकअप करतेय. मी आजारी पडली, मला धक्का बसलाय. एक अभिनेत्री तिला नुकताच पद्मश्री पुरस्कार दिला गेला तिने असे म्हटले की, आपल्याला स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिलाले आहे. पण भीक म्हणून तुला पद्मश्री मिळाला आहे असे राखीने कंगना हिला सुनावले आहे. आमच्या देशातील जवानांनी कारगिलच्या युद्धात जो विजय मिळवला होता तर त्यांचे बलिदान व्यर्थ आहे का? ज्या प्रकारे कमेंट्स केल्या जात आहेत त्याबद्दल दु:ख होत आहे.

Related Stories

No stories found.