अजितदादा इमानाने काम करतात, त्याची जाहिरात करीत नाहीत!

एखादी कुठली तरी चुकीची गोष्ट असेल तर तेवढीच अधोरेखित होते. त्यांनी केलेलं काम समोर आणा, ते खरंच चांगले नेते आहेत
Nana Patekar, ajit pawar
Nana Patekar, ajit pawarsarkarnama

पुणे : ''राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही, आम्हाला अधिक प्रसिद्धी मिळते,'' असे सांगत अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं कैातुक केलं आहे. ''अजित पवार हे खूप काम करतात, पण त्याची जाहिरात कधी करीत नाहीत. ते इमानाने गुपचूप काम करीत राहतात,'' असे नाना पाटेकर म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

नाना पाटेकर म्हणाले, ''राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही, आम्हाला अधिक प्रसिद्धी मिळते. अजितदादा इमानाने गपचूप काम करीत राहतात. एखादी कुठली तरी चुकीची गोष्ट असेल तर तेवढीच अधोरेखित होते. त्यांनी केलेलं काम समोर आणा, ते खरंच चांगले नेते आहेत,''

Nana Patekar, ajit pawar
मोठी बातमी : 'ग्लोबल टिचर' डिसले गुरुजींवर कारवाईची प्रक्रिया सुरु

सध्या देशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'आयाराम-गयाराम' सुरु आहे. याबाबत नाना पाटेकर म्हणाले, ''पक्ष बदलणाऱ्या माणसाला पाच वर्षे कोणतेही पद देऊ नका. मग कोणीही पक्ष बदलणार नाही, काहीतरी नियम असायला हवे. किमान शिक्षणाची अट हवी,''

शिरुर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. यावरुन सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. अमोल कोल्हेंवर काही जणांनी टीका करत विरोध करत आहेत, तर, काहींनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केलं आहे नाना पाटेकर यांनी देखील अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे.

Nana Patekar, ajit pawar
अखेर मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजलं

ते म्हणाले, ''अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत. त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तीस वर्षांपूर्वी मी देखील ही गोडसेंची भूमिका केली होती. पण आता मी भूमिका केली म्हणजे मी त्यांचं समर्थन करतो असं होतं का? समर्थन केले असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. मला विचारलं तुम्ही गोडसेची भूमिका का केली? ते माझं उपजीविकेचे साधन, यात माझी काय चूक आहे का?''

''कोविडचे नियम सर्वांनी पाळायला हवे. नियम पाळतो म्हणजे स्वतःवरच उपकार करीत आहोत. कोविडच्या काळात नाती समजली. कोरोनाने सर्वांना जमिनीवर आणलं. सरकार तर आहेच, पण सर्वांनी स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे,'' असे पाटेकर म्हणाले.

Nana Patekar, ajit pawar
रामदास कदमांच्या हातातून दापोलीपाठोपाठ मंडणगडही जाणार

'मुलगी झाली हो'फेम अभिनेते किरण माने यांना मात्र नाना पाटेकर यांनी फटकारले. 'आजूबाजूला काय चुकीचं चाललंय याचं मला काही देणंघेणं नाही. मी माझं काम करत राहतो. माझी राजकीय भूमिका कशासाठी असावी? समाजाप्रती भूमिका काय आहे ते महत्त्वाचं आहे. काम करत राहायचं आणि एक दिवस कापरासारखं विरून जायचं,' असं पाटेकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com