अधिकारी, कर्मचाऱ्यांनो दिवाळी गिफ्ट घ्याल तर सावधान; आयुक्तांनी दिला इशारा...

PCMC : डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात भेटवस्तू न घेण्याच्या आदेशाची तंतोतंत व काटेकोर अंमलबजावणी झाली होती.
PCMC Latest News
PCMC Latest NewsSarkarnama

पिंपरी : दिवाळी या महिन्यात आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) आपले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे आता दिवाळीत नागरिक, ठेकेदार वा अन्य संस्थांकडून भेटवस्तू तथा गिफ्ट घेऊ नये, असा आदेश पालिका आय़ुक्त शेखरसिंह यांनी आज (ता.१३ ऑक्टोबर) काढला. पण, तो पाळला जाण्याची शक्यता धूसर असल्याचे पूर्वानूभव सांगत आहे. (PCMC Latest News)

PCMC Latest News
नाथाभाऊंचा जळगाव पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या; वातावरण तापले...

दरम्यान, हा आदेशच संदिग्ध आहे. त्यात दिवाळीनिमित्त भेटवस्तू म्हणजे गिफ्ट घेऊ नयेत, असा स्पष्ट व थेट उल्लेखच नाही. फक्त गिफ्ट घेऊ नयेत, असेच म्हटले आहे. या पळवाटेचा फायदा नक्कीच घेतला जाण्याची शक्यता आहे. कार्यालयामध्ये भेटवस्तू न घेता त्या बाहेर, मात्र घेतल्या जातात व जातील, याच शंका नाही. त्या घेऊन महापालिका इमारतीत येणाऱ्यांना सुरक्षारक्षकांनी प्रवेश देऊ नये, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर गिफ्ट ही आपल्या वतीने घेण्यास कुटुंबाला वा इतर कुठल्याही व्यक्तीला परवानगी देऊ नये, असेही सांगण्यात आले आहे. त्यानंतरही त्यांनी ती घेतल्याचे दिसून आल्यास त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

PCMC Latest News
भाजपच्या 'मिशन बारामती'ला सुरुंग; 'रासप'ने केली मोठी घोषणा...

अत्यंत प्रामाणिक आणि कार्यक्षम तत्कालीन पालिका आयुक्त आणि बुलडोझर मॅन अशी प्रतिमा असलेले डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात भेटवस्तू न घेण्याच्या आदेशाची तंतोतंत व काटेकोर अंमलबजावणी झाली होती. त्यांच्या काळात जेवढी शिस्त प्रशासनाला लागली होती, तेवढी ती नंतर आतापर्यंत कधीच दिसली नाही. प्रत्येक कर्मचारी,अधिकारी हा ड्रेसकोडमध्ये दिसत होता. कार्यालयाच्या भिंती व जिने पिचकाऱ्यांनी रंगलेले नव्हते. उलट त्यांच्यानंतर पालिका मुख्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) एक नाही, तर अनेक ट्रॅप झाले.

खुद्द तत्कालीन आयुक्तांचा `पीए`च १२ लाखाची लाच घेताना पकडला गेला. पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समितीतील टक्केवारी जगजाहीर आली. समिती कार्यालयावरच एसीबीची धाड गेल्यावर्षी पडली. सध्या पालिकेचा चतुर्थश्रेणी कर्मचारीही गणवेशात दिसत नाही. अशा वातावरणात भेटवस्तू स्वीकारण्याची पडलेली प्रथा यावर्षी, लगेच तरी मोडली जाण्यााची शक्यता कमीच दिसते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com