पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या सत्काराला विनयभंगातील आरोपी व्यासपीठावर!

आळंदीतील कार्यक्रमात पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यासोबत व्यासपीठावर आरोपीचा वावर
Krishnaprakash
KrishnaprakashSarkarnama

आळंदी (जि. पुणे) : विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीने पिंपरीचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishnaprakash) यांच्यासोबत आळंदीतील एका कार्यक्रमात व्यासपीठावर जाऊन छायाचित्र काढले. तसेच, त्या आरोपीचा व्यासपीठावर खुला वावर होता. हा प्रकार आळंदीत (Alandi) चर्चेचा विषय झाला आहे. किमान स्थानिक पोलिसांनी तरी या आरोपीस व्यासपीठावर जाण्यास मज्जाव करावयास हवा होता, अशी चर्चा आळंदीत होत आहे. (Accused took a photo with Commissioner of Police Krishnaprakash at a function in Alandi)

पिंपरी चिंचवड हद्दीतील कष्टकरी कामगार, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, टपरी पथारी हातगाडी पंचायत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन आळंदीतील हराळे वैष्णव धर्मशाळेत गुरुवारी (ता. २ डिसेंबर) करण्यात आले होते. या वेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲड विकास ढगे, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, डी. डी. भोसले, ज्ञानेश्वर रायकर, तसेच अनेक सामाजिक क्षेत्रातील मंडळींची उपस्थिती होती.

Krishnaprakash
राष्ट्रवादीच्या सोळंके - पंडितांचे पॅचअप : आता वाटचाल कोणत्या दिशेने?

बाबा कांबळे यांचे बालपण आळंदीत वारकरी संप्रदायात गेले. त्यानंतर त्यांनी पिंपरी महापालिकेत कष्टकऱ्यांसाठी काम केले. त्यानिमित्ताने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यावेळी विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी आयुक्त कृष्ण प्रकाश यांना माऊलींची प्रतिमा भेट देत असताना व्यासपीठावर उपस्थित होता. आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या जवळ उभे राहून छायाचित्रही काढले. एवढेच नाही तर संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत तो व्यासपीठावरही वावरत होता.

Krishnaprakash
बरमुड्यावर आलेल्या ‘त्या’ अधिकाऱ्यांने दिली वाळू माफियांना हुलकावणी...

संबंधित आरोपीने नगर जिल्ह्यातून आळंदीत देवदर्शनासाठी आलेल्या महिलेचा दोन महिन्यांपूर्वी विनयभंग केला होता. त्याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटकही करण्यात आली होती. संबंधित महिला नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातून आळंदीत देवदर्शनासाठी आली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास पालिका वाहनतळाच्या जागेतील आरोपी चालवित असलेल्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याने महिलेचा विनयभंग केला होता. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. संबंधित आरोपी हा आळंदीत पथारी हातगाडी संघटनेचा आळंदी शहराध्यक्ष म्हणून गेली काही वर्षे शहरात मिरवत आहे. यापूर्वीही त्यांच्याबाबत अनेक तक्रारी आलेल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com