कारागृह अधिक्षकाच्या मुलाचा खून करणाऱ्या आरोपींना अटक
Pune Crime news update|

कारागृह अधिक्षकाच्या मुलाचा खून करणाऱ्या आरोपींना अटक

Pune Crime news update| गिरीधर आणि संबंधित तरुणी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते.

Pune Crime news update

पुणे : अमरावतीच्या कारागृह निरीक्षकाच्या मुलाचा पुण्यात खून झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) आरोपींना अटक केली आहे. या सर्व आरोपींना ३० मे पर्यंत पोलीस कोठीडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी हडपसर पोलिसांनी वर्षा सुरेश कमने उर्फ महेक अरमान शेख (वय २०, रा. काळे बोराटेनगर, हडपसर), अरबाज उर्फ अल्लाउद्दीन शेख (वय २१), भैय्या उर्फ प्रदीप अंकुश चव्हाण (वय २०), आकाश जगन्नाथ देवकाते (वय २०, सर्व रा. माढा, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Pune Crime news update|
कारागृह अधिक्षकाच्या मुलाचा पुण्यात खून

गिरीधरचे वडील उत्रेश्‍वर गायकवाड हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात कारागृह निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री गिरीधर आपल्या घरात बसला होता. अचानक त्याला कॉल आला आणि तो घाईघाईने घराबाहेर पडला. घरातून बाहेर पडताना गिरीधरच्या भावाने निखिलने त्याला विचारले असता त्याने मैत्रीणीने बोलावले असल्याचे सांगत तिला भेटून येतो, असे सांगून गेला

अर्धा तास उलटून गेला तरी गिरीधर घरी न परतल्याने त्याच्या आई, भावाला काळजी वाटू लागली. त्याचवेळी त्याच्या वडील उत्रेश्‍वर गायकवाड यांनी कॉल करुन दोघांना गिरीधरचा खून झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचे कुटुंबीय व वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे व अन्य पोलिस अधिकारी घटनास्थळी पोचले. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला होता.

याप्रकरणी गिरीधरचा भाऊ निखिलकुमार गायकवाड (वय 27) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. गिरीधर आणि संबंधित तरुणी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यावेळी तरुणीचा तिच्याच वर्गातील एका तरुणासमवेत प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर तरुणी व गिरिधर यांच्यात जवळीक वाढली होती. याच कारणावरून तरुणी व तिच्या पतीची भांडणे होत होती. मंगळवारी रात्री तरुणीच्या पतीने मद्यपान केल्यानंतर गिरिधरला बोलावून घेण्यास सांगितले. त्यानंरतर हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे गिरिधर आल्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in