किरीट सोमय्या हल्ला प्रकरणातील आरोपी पुणे पोलिसांसमोर हजर

माजी खासदार किरीट सोमय्या यांना शनिवारी पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की व मारहाण करण्याचा प्रयत्न झाला.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama

पुणे : भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपी असलेले शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, राज्य सचिव किरण साळी यांच्यासह इतर चारजण आज सकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाले.या प्रकरणी पोलिसांनी याआधी दोन आरोपींना अटक केली आहे.

Kirit Somaiya
एकनाथ शिंदेंचा समर्थकांना तातडीचा निरोप; ‘ते शब्द' हटवा!

माजी खासदार किरीट सोमय्या यांना शनिवारी पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की व मारहाण करण्याचा प्रयत्न झाला.जम्बो कोवीड रूग्णालयातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशी मागणी करण्यासाठी सोमय्या महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांना निवदेन देण्यासाठी जात असताना त्यांना अडवण्यात आले.सुरवातीला त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर त्यांना धक्काबुक्की करण्यात आली व बचाव करून जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Kirit Somaiya
दादा तुमच्या आमदारांना आघाडीचा धर्म शिकवा, उद्धाटन कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध

या प्रकरणात शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह किरण साळी, सुरज लोखंडे, चंदन साळुंके, आकाश शिंदे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे व सनी गवते या आठ जणांवर १४३,१४९, १४७,३४१, ३३७ व ३३६ या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सर्वांना शोधण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली असून लवकरच या सर्वांना अटक करण्यात येईल, असा विश्‍वास पोलीस आधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता.या पाश्‍र्वभूमीवर आज सकाळी सर्व आरोप स्वत: हजर झाले आहेत.सनी गवते व चंदन साळुंके यांना पुणे पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.

दरम्यान, सोमय्यांवर करण्यात आलेला हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाची तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी यापूर्वीच केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in