दुर्दैवी : मतदान साहित्य आणण्यासाठी निघालेल्या तरुण शिक्षकाचा अपघाती मृत्यू

वेल्हे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी देशमुख यांची मतदान अधिकारी क्रमांक तीन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
Teacher Sagar Deshmukh
Teacher Sagar DeshmukhSarkarnama

वेल्हे (जि. पुणे) : ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchyat) उद्या (ता. १८ डिसेंबर) सर्वत्र मतदान होणार आहे. त्यासाठी मतदान केंद्र अधिकारी आपापल्या नियुक्तीच्या ठिकाणी साहित्य घेऊन जात आहेत. वेल्हे (Velhe) तालुक्यात मतदान साहित्य वाटप केंद्रावर दुचाकीवरून जात असताना ट्रकची धडक बसून शिक्षकाचा (Teacher) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज वेल्हे तालुक्यातील धानेप गावच्या हद्दीत घडली. (Accidental death of a teacher who was on his way to bring voting materials)

सागर नामदेव देशमुख (वय ३३, मूळगाव वारगुंसी, ता. अकोले, जि. नगर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते वेल्हे तालुक्यातील कंधारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. वेल्हे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी देशमुख यांची मतदान अधिकारी क्रमांक तीन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहिती वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली.

Teacher Sagar Deshmukh
Rashmi Thackeray : रश्मी ठाकरेंचा महामोर्चात सहभाग अन्‌ ठाकरेंच्या 'त्या' विधानाची पुन्हा रंगली चर्चा!

शिक्षक देशमुख हे पानशेतकडून कादवे मार्गे वेल्हे याठिकाणी मतदान साहित्य वाटप केंद्रावर येत होते. त्यावेळी धानेप गावच्या हद्दीत हा अपघात घडला. देशमुख यांच्या दुचाकीला एम एच १२, एमव्ही ५१९० ह्या क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यांना उपचारासाठी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर हिरास यांनी दिली.

Teacher Sagar Deshmukh
Mahavikas Aaghadi Morcha : राज्यपालांची तातडीने हकालपट्टी करा; अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल : शरद पवार कडाडले

याबाबत वेल्ह्याचे गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे म्हणाले की, अतिशय प्रामाणिक, कार्यतत्पर अशा शिक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने पूर्ण शिक्षण विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे. देशमुख यांचा तीन वर्ष शिक्षण सेवकाचा कार्यकाल संपल्याने सेवा नियमित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी होता. या घटनेबाबत वेल्हे पोलिस ठाण्यात संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे अंमलदार औदुंबर अडवाल यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com