ACB News : 'व्हॅलेंटाईन' च्या दिवशी महावितरणच्या दोघांना ACB कडून 'शॉक'

ACB News : दोघेही वकील असल्याने वकीलवर्गातही मोठी खळबळ उडाली आहे.
 ACB NEWS :
ACB NEWS :sarkarnama

ACB News: राज्य वीज वितरण कंपनी तथा महावितरणचे विधी सल्लागार आणि सहाय्यक विधी अधिकारी असे वर्ग एकचे दोन अधिकारी काल (ता.१४) `व्हॅलेंटाईन`च्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB)जाळ्यात अडकले. त्यामुळे `महावितरण`च्या पुणे मुख्यालयातच नाही,तर हे दोघेही वकील असल्याने वकीलवर्गातही मोठी खळबळ उडाली आहे.

विधी सल्लागार सत्यजीत विक्रम पवार आणि सहाय्यक विधी अधिकारी समीर रामनाथ चव्हाण अशी अटक लाचखोरांची नावे आहेत. त्यांना चाळीस हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले.

पवार हे `महावितरण`च्या रास्ता पेठ या पुणे विभागीय मुख्यालयात,तर चव्हाण हे गणेशखिंड कार्यालयात कार्यरत आहेत.त्यांच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात पुणे एसीबी युनिटने दिलेल्या फिर्यादीवरून लाचखोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 ACB NEWS :
Sanjay Raut :फडणवीसांना नेमकी कशाची भीती वाटते ? ; एवढा कांगावा कशासाठी करताहेत ?

गेल्या महिन्यात याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. तिची १८ आणि १९ जानेवारीला पडताळणी करण्यात आली. त्यानंतर काल ही कारवाई (ट्रॅप) झाली. एका इमारत मालकाकडे या लाचखोर अधिकाऱ्यांनी चाळीस हजार रुपये लाच मागितली होती.

या तक्रारदाराच्या इमारतीत ११ इलेक्ट्रीक मीटर बसवायचे होते.त्यासाठी त्यांनी केलेल्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती. त्या हरकतीवर अनुकूल शेरा देण्याकरिता या दोघांनी लाच मागून काल ती घेतली.त्यांना न्यायालयात आज हजर केले जाणार आहे. एसीबीचे पीआय श्रीराम शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com