Amol Kolhe : मतदारसंघातील रोहित पवारांच्या आत्मक्लेष आंदोलनाकडे कोल्हेंनी फिरवली पाठ

Amol Kolhe News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद सध्या राज्यभर उमटत आहेत.
Amol Kolhe Ncp
Amol Kolhe NcpSarkarnama

Amol Kolhe News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद सध्या राज्यभर उमटत आहेत. त्याविरोधात शिवरायांचे वंशज आणि खासदार उदयनराजे यांनी रायगड किल्यावर आज (ता.३) आत्मक्लेश केला. तर, छत्रपती संभाजीमहाराजांच्या श्री क्षेत्र वढू बुद्रूक (ता. शिरूर, जि. पुणे) येथील समाधीस्थळी आजच राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) मौन धरून आत्मक्लेष आंदोलन केले.

मात्र, त्याला पक्षाचे स्थानिक खासदार (शिरूर) आणि शिवराय आणि संभाजीप्रेमी डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हेच गैरहजर राहिल्याने त्याची मोठी चर्चा होत आहे. कर्जत-जामखेडचे (जि.नगर) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे आठ आमदार, माजी आमदार व इतर पदाधिकारी हजर होते. मात्र, संभाजीमहाराजांच्या भुमिकेतून विशेष प्रकाशझोतात आलेले अभिनेते कोल्हे गैरहजर असल्याने त्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Amol Kolhe Ncp
Abdul Sattar : सत्तारांच्या अडचणी वाढणार? राज्यपालांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

शिर्डी (जि.नगर) येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनालाही त्यांनी दांडी मारल्याने त्याची याअगोदरच मोठी चर्चा रंगली होती. त्यावर आजारी असल्याचे कारण त्यांनी दिले होते. मात्र, शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधातील आत्मक्लेष आंदोलनातील त्यांची गैरहजेरी अनेकांना, अगदी त्यांच्या चाहत्यांनाही खटकून गेली. दरम्यान, आज ते वैयक्तिक कामासाठी औरंगाबाद येथे गेल्याचे समजते.

महाराष्ट्राच्या अस्मितेविरोधात बोलल्यास शांत बसणार नाही, असा इशारा वढू येथील आत्मक्लेष आंदोलनानंतर रोहित पवार यांनी दिला. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा सतत होत असलेला अवमान हा महाराष्ट्रातील शिवभक्तांसाठी अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत त्यातून शेकडो वर्षाच्या सामाजिक परंपरेला तडा देण्याचे काम काही व्यक्तींकडून सुरु असल्याबद्दल त्यांनी खंत व खेदही व्यक्त केला. शिवराय ही महाराष्ट्राची अस्मिता असून त्यांच्याविरुद्ध कोणी बोलत असेल, तर त्याला विरोध केला पाहिजे, तो झाला पाहिजे, असे गेल्या महिन्यात २० तारखेला पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले होते.

Amol Kolhe Ncp
Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विकास ढाकणे यांची नियुक्ती

तर, ज्यांचे पराक्रमी कर्तृत्व व त्यागामुळे आज आपण स्वाभिमानाने जगत आहोत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही, अन्यथा भावी पिढीही आम्हाला माफ करणार नाही, असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. रोहित पवार यांच्यासह अशोक पवार, अमोल मिटकरी, सुनिल टिंगरे, नितीन पवार, प्राजक्त तनपुरे, संदीप क्षिरसागर, अतुल बेनके, हे आमदार तसेच माजी आमदार जयदेव गायकवाड आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com