MNS : राज ठाकरेंसाठी दगडूशेठ गणपतीला मनसैनिकांचं साकडं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यात आज विविध मंदिरात पूजा अभिषेक करण्यात येत आहे.
MNS : राज ठाकरेंसाठी दगडूशेठ गणपतीला मनसैनिकांचं साकडं
Raj Thackeray latest marathi newsSarkarnama

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात आज शस्त्रक्रिया (surgery) होत आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यात आज विविध मंदिरात पूजा अभिषेक करण्यात येत आहे. (Raj Thackeray latest news)

पुण्यात मनसैनिकांकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, शारदा गणपती, कसबा गणपती, चतुशृंगी मंदिर या सर्व ठिकाणी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून पूजा आणि आरती करण्यात आली.

Raj Thackeray latest marathi news
राष्ट्रपती निवडणूक : शरद पवारांच्या बैठकीसाठी ममतांकडे वेळ नाही

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे हे शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. पण तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये कोरोनाच्या डेड सेल्स आढळून आल्याने त्यांच्यावरील शस्त्रक्रिया थांबविण्यात आली होती.

राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in