Pimpri News : अबब.. चक्क अडीच हजार दिवस सलग तो नोकरीवर आला नाही, अखेर झाला बडतर्फ!

Pimpri Chinchwad News : सरकारी नोकरी कुणाला नको असते?
Pimpri Chinchwad News :
Pimpri Chinchwad News : Sarkarnama

Pimpri Chinchwad News : सरकारी नोकरी हल्ली मिळणे मोठे मुश्किल झाले आहे. तर दुसरीकडे ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे, त्यांना त्याची पर्वाच नसल्याचा प्रत्यय पिंपरी महापालिकेत (PCMC) आला आहे. तेथील एक शिपाई चक्क सात वर्षे कुठलेच कारण न देता विनापरवाना कामावर आलाच नाही. त्याची परिणाम म्हणजे आज या कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकण्यात आले. (Latest Maratthi News)

गुन्हेगारी वर्तन आणि लाचखोरीबद्दल यावर्षी व या अगोदरची पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनेक कर्मचारी हे निलंबित झालेले आहेत. त्यातील लाचखोरीतील पुन्हा कामावरही रुजू झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, तब्बल दोन हजार २५५ दिवस गैरहजर राहिल्याने या पालिकेचा कर्मचारी प्रथमच बडतर्फ झाला आहे.

Pimpri Chinchwad News :
Karnataka Election : भाजप नेत्याच्या मोटारीत सापडले EVM मशीन? लोकांनी केली तोडफोड !

सुनील वसंत पाटील असे त्याचे नाव आहे. 'ह' क्षेत्रीय कार्यालयात तो शिपाई होता. पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी आज त्याला सेवेतून काढल्याचा आदेश जारी केला. त्यापूर्वी त्याला सुधारण्याच्या म्हणजे सेवेत राहण्याच्या अनेक संधी देण्यात आल्या होत्या. पण, ती एकही त्याने घेतली नाही. एवढेच नाही, तर गैरहजर राहिल्याचे कारणही त्याने अद्यापर्यंत दिलेले नाही. त्याबद्दल खुलासा केला नाही. काढण्यात आलेल्या नोटीसांनाही त्याने केराची टोपली दाखवली. त्यातून त्याला नोकरीची गरज व गांभीर्य नसल्याने आयुक्तांनी कारवाईचे शेवटचे पाऊल उचलले.

Pimpri Chinchwad News :
Abdul Sattar On Court Decision : उद्याचा निकाल विरोधात गेला तरी स्वागत करू, सत्तार हे काय बोलून गेले..

दरम्यान, पाटील हा त्याच्या राहत्या पत्यावर आढळला नाही. त्यामुळे त्याच्याशी पालिकेने केलेला सर्व पत्रव्यवहार परत आला. परिणामी पालिका प्रशासनाने त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यालाही यश आले नाही. म्हणून पाटील याला काढून का टाकण्यात येऊ नये, या इशाऱ्याची नोटीस पेपरला देण्यात आली. त्यालाही प्रतिसाद न आल्याने अखेर पालिका प्रशासनाने पोलिसांत (निगडी पोलिस ठाणे) धाव घेतली. तेथे पाटील मिळून येत नसल्याची तक्रार २०२१ ला दिली. तेव्हा त्यांना त्याच्याविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे समजले. तरीही त्यानंतर त्याला सेवेतून काढण्यासाठी त्यांनी दोन वर्षे घेतली.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com