पुण्यात पाणी प्रश्‍नावर ‘आप’ आक्रमक : पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे !

‘टँकर माफिया मुक्त दिल्ली’च्या धर्तीवर ‘टँकरमुक्त पुणे’ करण्याची घोषणा ‘आप’ने केली आहे.
पुण्यात पाणी प्रश्‍नावर ‘आप’ आक्रमक : पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे !
Aam Aadmi Partysarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : वाढत्या उष्म्यासोबतच पुण्यात पाणी प्रश्नही पेटू लागला आहे. पाणी पुरवठा केंद्रात मुबलक पाणी साठा असून ही नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. या बाबत सर्व स्तरांतून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. पुरेसे पाणी द्या अन्यथा टँकरचे पैसे द्या, अशी भूमिका आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) घेतली आहे.

Aam Aadmi Party
महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेससह भाजपचाही धुव्वा

‘टँकर माफिया मुक्त दिल्ली’च्या धर्तीवर ‘टँकरमुक्त पुणे’ करण्याची घोषणा ‘आप’ने केली आहे. या संदर्भात आपचे प्रवक्ते डॉ. अभिजीत मोरे म्हणाले, ‘‘ दिल्लीतील नागरिकांना हक्काचे वीस हजार लिटर पाणी मिळते.मात्र, पुण्यात कर भरणाऱ्या नागरीकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. आठशे ते हजार रुपये प्रति टँकर दराने पैसे मोजावे लागत आहेत. अनेक रहिवासी सोसायट्या या टँकर माफियांच्या विख्यात सापडल्या आहेत. हे टँकर माफियाचे जाळे स्थानिक राजकिय नेत्यांच्या वरदहस्ताने चालते हे सर्व जण जाणतात.’’

Aam Aadmi Party
भाजपला टक्कर देणं पडलं महागात; मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्र्यालाच थेट घरी बसवलं

डॉ. मोरे म्हणाले, ‘‘ पुणे शहरात पाण्याचा मुबलक साठा असून ही नळाला मात्र पाणी येत नाही अशी खंत महिला व गृहिणी व्यक्त करीत आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या भागांत पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्या भागात अजून ही पाणी पोहोचलेले नाही. प्रस्थापित पक्षांनी सत्तेत असताना या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले आणि आता निवडणुकांचे वेध लागताच पाण्यासाठी आंदोलन करण्याचा देखावा करीत आहेत. या खेरीज काही लोक सत्तेत होते तेव्हा मूग गिळून बसले होते व सत्तेतून पायउतार होताच लोकांच्या पाणी प्रश्नासाठी म्हणून न्यायालयात धाव घेण्याचा दुटप्पीपणा करीत आहेत.’’

Aam Aadmi Party
आमदार गोरेंच्या अटकेसाठी राष्ट्रवादी आक्रमक; महेश तपासे घेणार सातारा एसपींची भेट...

पाण्याची वाहतूक करणाऱ्या टँकरमुळे घडणाऱ्या अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. या टँकर माफियांची दहशत इतकी आहे की ‘आरटीओ’ पासिंग नसलेल्या निकृष्ट दर्जाच्या वाहनांना ‘आरटीओ’ किंवा पोलीस प्रशासन अटकाव करीत नाही. यातील अनेक टँकर बिनबोभाटपणे पुण्याच्या रस्त्यावरूप धावत आहेत. यातून झालेल्या अपघातात अनेक निष्पाप पुणेकरांना जीव गमवावा लागला आहे. हे सर्व घडत असताना महानगरपालिका प्रशासन आपल्या कुंभकर्णी झोपेतून जागे व्हायला तयार नाही, असा आरोप डॉ मोरे यांनी केला आहे.

'टँकर मुक्त पुणे' हा नारा घेवून आम आदमी पक्ष रिंगणात उतरला आहे. आम आदमी पक्षाने पाणी प्रश्न ऐरणीवर घेतला आहे. ज्या भागांमध्ये नळ जोडणीद्वारा पाणी पुरवठा पोहोचला नाही त्या ठिकाणी महानगरपालिकेने स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा करणे क्रमप्राप्त आहे. त्याचा भुर्दंड नागरिकांवर बसवू नये अशी 'आप'ची मागणी असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले. पुणेकरांची कोंडी करून टँकरच्या माध्यमातून त्यांची लूट करणाऱ्या माफियांच्या विरोधात पक्षाचे राज्य संघटक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात तीव्र स्वरूपाचे जल हक्क आंदोलन छेडण्यात येणार असल्याच डॉ. मोरे यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.