AAP च्या पिंपरी पदाधिकाऱ्यावर भरदिवसा खूनी हल्ला, हल्लखोरांत दोन अल्पवयीन...

AAP|Pimpri-Chinchwad : कांबळे हे दुचाकीवरून घरी चालले होते. त्यावेळी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी येथे दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला.
Crime
Crime Sarkarnama

पिंपरी : शहरातील अल्पवयीनांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग लक्षात घेऊन ती कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (CP Krishna Prakash) यांनी काही उपाययोजना केली आहे. व्यसनातून ही मुले गुन्हे करीत असल्याने त्यांच्यासाठी व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र त्यांनी सुरु केले.तर, अशा मुलांना त्यांनी विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षणही देण्यास त्यांनी सुरवात करून त्यांची ऊर्जा विधायक कामाकडे वळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यातून त्यांनी `झुंड `च्या धर्तीवर अशा झोपडपट्यांतील मुलांची फूटबॉल टीमही तयार केली आहे. यानंतरही शहरातील बालगुन्हेगारीची समस्या कमी झाल्याचे दिसत नाही. पोलिस, मात्र ती कमी झाल्याचा दावा करीत आहे. तर, तो कसा फोल आहे, याला शनिवारच्या (ता.९ एप्रिल) घटनेने पुन्हा दुजोरा मिळाला. दोन अल्पवयीन मुलांसह तिघांनी आम आदमी पक्षाच्या (AAP) पिंपरी-चिंचवड (Pimpri-chinchwad) पदाधिकाऱ्यावर भरदिवसा खूनी हल्ला केला.

Crime
IPL: कोहली, रोहितच्या फॅनला अतिउत्साह नडला; पोलिसांशी वाद घातल्याने थेट तुरुंगात गेला

दोन अल्पवयीन मुलांसह तिघांनी आम आदमी पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर पदाधिकारी यशवंत श्रीमंत कांबळे (वय ४३, रा सांगवी) यांच्यावर कोयत्याने मागून वार केला. त्यात डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. `आप`च्या वाढत्या लोकप्रियततेून हा राजकीय हल्ला पाठलाग करून करण्यात आल्याचे त्यांनी आज 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. आगामी महापालिका निवडणूक सांगवी भागातून लढणार आहे. त्यातूनही हा हल्ला झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तर, नशेतील त्रिकूटाने तो केल्याचे भोसरी पोलिसांचा दावा आहे. दरम्यान, याप्रकरणी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवून त्यांनी दोन्ही अल्पवयीन गुन्हेगार मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. तर तिसरा आरोपी आकाश गंगाधर मिसाळ (वय २७, रा. थेरगाव) याला अटक करण्यात आली आहे.

Crime
फडणवीसांच्या 'त्या' दाव्याची ठाकरेंकडून चिरफाड; जाहिर यादीच वाचून दाखविली

कांबळे हे आपच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष आहेत. काल सकाळी पिंपरी येथे आपचे महागाई विरोधात आंदोलन होते. ते आटोपून कांबळे हे दुचाकीवरून घरी चालले होते. त्यावेळी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी येथे दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. राजकिय सूडबुद्धीने तो केला गेल्याचे आपचे शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनीही सांगितले. त्याचा त्यांनी व पक्षाने आज जुनी सांगवी येथे आंदोलन करून निषेध केला. पोलिसाचा वचक कमी होत चालल्याने गुन्हेगारी वाढली आहे, राजकीय व्यक्ती सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्यांची काय तऱ्हा अशी विचारणा यावेळी आपचे मोशी विभागप्रमुख शांताराम बोऱ्हाडे यांनी केली. तर, विचाराची लढाई विचाराने लढू शकत नसल्याने असे हल्ले होत असल्याचे डॉक्टर विंगचे अध्यक्ष डॉ. अमर डोगरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com