आदर पूनावाला पुण्यासाठी लस द्यायला तयार.....पण ?

सिरम संस्था पुण्यात असल्याने पुण्यासाठी आधी लस मिळावी अशी सर्वांचीच भावना आहे.
mohol-poonawala
mohol-poonawala

पुणे : पुण्याला लवकरात लवकर लस मिळावी यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रमकुमार सिरम संस्थेकडे गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहेत. सिरमकडूनही पुण्यासाठी सकारात्क प्रतिसाद मिळत आहे. मात्र. पुण्यासाठी विशेष बाब म्हणून केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली तरच पुण्याला पुरेशा प्रमाणात थेट लस मिळू शकेल. या संदर्भातील पत्रव्यवहार सुरू असून लवकरात लवकर पुणेकरांसाठी लस मिळविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे महापौर मोहोळ यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.(Aadar Poonawala ready to vaccinate for Pune: But?)

सिरम संस्था पुण्यात असल्याने पुण्यासाठी आधी लस मिळावी अशी सर्वांचीच भावना आहे. मात्र, देशात तसचे विदेशात लस वितरण करताना संस्थेला केंद्र सरकारने वितरणासाठी ठरवून दिलेले नियम पाळावे लागतात. लस पुण्यात तयार होते. म्हणून पुण्याला प्राधान्याने द्या महापौरांची मागणी पुण्यासाठी योग्य असली तरी केंद्र सरकारला एकाच राज्याला, एकाच शहराला संपूर्ण पुरवठा करण्याची परवानगी देण्यात अडचणी आहेत. त्यामुळे महापौर मोहोळ व आयुक्त विक्रमकुमार यांच्या मागणीला कितपत यश मिळेल हे येत्या काळात स्पष्ट होईल. या संदर्भात संपर्क साधला असता ‘सरकारनामा’शी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘ गेल्या दोन महिन्यांपासून सिरम संस्थेच्या संपर्कात आहोत. आवश्‍यक असलेला पत्रव्यवहारदेखील झाला आहे. सिरमचे व्यवस्थापकीय संचालक आदर पूनावाला पुण्याला प्राधान्याने लस देण्याच्या बाजूचे आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या परवानगीच्या काही तांत्रिक बाबी आहेत. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्यासाठी मी स्वत: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवधन यांना पत्र लिहिले आहे. येत्या काही दिवसात यातून मार्ग निघेल, असा मला विश्‍वास वाटतो.’’

महापौर मोहोळ म्हणाले, ‘‘ सिरम कंपनीकडे पाठुपरावा सुरू असला तरी दुसरीकडे ग्लोबल टेंडरसाठीची प्रक्रियदेखील महापालिका करीत आहे. मात्र, त्यात व्यावहारीक अडचणी आहेत. मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढले होते. मात्र, जगभरातील लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रयत्न केला तरी या व्यावहारीक अडचणी आहेत.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com