आंबेगावातील शालेय बस दरीत कोसळली; ४४ विद्यार्थी जखमी

Accident : बचाव पथकाला माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य करण्यास सुरुवात केली.
Accident, News pune School Bus
Accident, News pune School BusSarkarnama

पुणे : आंबेगाव तालूक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळगावच्या शाळेची बस दरीत कोसळून तब्बल ४४ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये तीन शिक्षकांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. या अपघातामधील सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले असू रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Accident, News pune School Bus
संजय राऊतांना दिलासा नाहीच; यंदाचा दसरा कोठडीत...

प्राप्त माहितीनुसार, मुक्ताई प्रशाला पिंपळगाव शाळेचे विद्यार्थी गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेले होते. या प्रवासादरम्यान शाळेची बस दरीत कोसळली आणि बसमध्ये असलेले ४४ विद्यार्थी आणि तीन शिक्षकही जखमी झाले आहे. याबाबत बचाव पथकाला माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य करण्यास सुरुवात केली आणि सर्व मुलांना बाहेर काढले.

Accident, News pune School Bus
खाकीतील निशस्त्र `दुर्गे`चे धाडस, बॅंकेबाहेर लुटमार करणाऱ्या पिस्तूलधारी लुटारुला पकडले

बसमधील सर्वांना ॲम्बुलन्सच्या मार्फत ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच ४ मुलांना मंचर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com