
PCMC News: आंतरवाली सराटी (ता. अंबड, जि, जालना) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी नुकत्याच केलेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद सध्या राज्यभर उमटत आहेत. त्याविरोधात महायुती वगळून महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष आणि संघटनांकडून जोरदार निदर्शने सुरू असून बंदही पाळला जात आह. तसाच तो येत्या शनिवारी (ता.९) पिंपरी-चिंचवडमध्ये पाळला जाणार आहे.
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने ही उद्योगनगरी बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला कॉंग्रेस (Congress), ठाकरे शिवसेना, मनसे, शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) पाठिंबा दिला आहे. आरोग्यसेवा व अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. सर्व कंपन्या, कारखाने, शासकीय सेवा, शाळा, महाविद्यालये, शहरातील व्यापारी यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मराठा मोर्चाने केले आहे.
दरम्यान, आंतरवलीसारखे बेमदूत उपोषण उद्यापासून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संभाजी ब्रिगेडतर्फे सुरू करण्यात येणार असल्याचे ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी सांगितले. मराठा समाजाला 'ओबीसी' प्रवर्गातून आरक्षण द्यावे, जातीनिहाय जनगणना करावी, एकाच पक्षाचे असलेले केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी तातडीने हालचाली करून आरक्षण मार्गातील सर्व अडथळे दूर करावेत.
तसेच मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे, समाजाची दिशाभूल करू नये, अमानुष लाठीहल्ल्याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षण आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशा मागण्या मराठा मोर्चाने केल्या आहेत.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.