कार्यक्रम सत्काराचा की निरोप समारंभाचा? पुण्याच्या माजी महापौरांना पडला प्रश्न...

Murlidhar Mohol : गोपीनाथ मुंडे यांनी काम करण्याची प्रेरणा आणि आधार दिला.
Murlidhar Mohol- Jagdish Mulik , Chandrakant Latest News
Murlidhar Mohol- Jagdish Mulik , Chandrakant Latest Newssarkarnama

पुणे : पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भाजपचे राज्याचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाल्यामळे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोहोळ यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात मोहोळ यांनी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात काम करावे, पुणे आता आम्ही सांभाळू..,अशा शब्दात भाजप पुणे शहराध्यक्ष जगदिश मुळीकांनी चिमटा काढला. त्यावर हा माझा सत्कार आहे की निरोप समारंभ?,अशी मोहोळांनी केलीली कोटी, त्यावर चांगल्या कामासाठी तुम्हाला प्रमोशन दिले. मात्र पुण्यातून तुमची सुटका नसून पुण्यातही काम करायचयं, असा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेला आदेशवजा सल्ला. या कोपरखळयांनी या सत्कार समारंभाला चांगलीच रंगत आली.

मोहोळ यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाल्याने पुण्याचे पालकमंत्री व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटीलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, पुण्याचे प्रभारी धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते गणेश बीडकर आदी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजप हा सातत्याने भविष्याचा आणि नव्या पिढीचा विचार करणारा पक्ष असून तरूणांना संधी देतो. पक्षात संघटनात्मक निवडणुका जरी झाल्या नसल्या तरी पक्षात लोकशाही पद्धतीने काम होत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपमधील एक सहकारी मोठा झाला. तो आनंद व्यक्त करण्याचा तसेच, आम्ही त्याच्या पाठीशी आहोत, असा विश्वास देणारा हा कार्यक्रम असल्याचेही पाटलांनी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी बोलतांना मोहोळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, गेली ३० वर्षांपासून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पक्ष हाच परिवार मानून काम केले असून वॉर्ड अध्यक्ष ते महापौर आणि आता राज्य सरचिटणीस ही संधी पक्षाने माझ्यावर टाकली आहे. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. चंद्रकांतदादा यांच्या म्हणण्याप्रमाणे बंद पाकिटातून पक्ष देईल, त्या आदेशाप्रमाणे काम करत असून पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी काम करण्याची प्रेरणा आणि आधार दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा यांच्यासह सर्वच नेत्यांकडून खूप शिकायला मिळाले आहे. संघटनेने टाकलेला विश्वास मी कधीही ढळू देणार नाही, अशा शब्दात मोहोळांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, शहाराध्यक्ष मुळीक आपल्या भाषणात म्हणाले की, मोहोळ हे कार्यकर्त्यांमध्ये रमणारे नेते असून आम्ही एकत्र काम केले आहे. महापालिकेतील पाच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपने पुणेकरांसाठी खूप काम केले. त्यात स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर म्हणून मोहोळ यांचा मोलाचा वाटा होता, असे कौतूक मुळीकांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com