Bazar Samiti : या सहा बाजार समित्यांवरील सत्तासंघर्ष शिगेला; दोन्ही गटांना समान जागा मिळाल्याने राज्याचं लक्ष

APMC Election News : अनेक ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना लढत
MVA and BJP, Shivsena
MVA and BJP, ShivsenaSarkarnama

MVA vs BJP and Shivsena : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतपेरणीसाठी बाजार समित्यांवर वर्चस्व ठेवणे महत्वाचे ठरते. त्या अनुषंगाने नुकत्याच पार पडलेल्या २५३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत राज्यातील सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. या निवडणूक दोन टप्प्यात पार पडल्या आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. मात्र अनेक ठिकाणी स्थानिक कार्यकर्यांनी सोयीनुसार पॅनल तयार करून निवडणुका लढविल्याचेही दिसून आले. दरम्यान, चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत काही बाजर समितीत दोन्ही गटांना समान जागा मिळाल्या आहे. अशा बाजार समित्यांवर कुणाचा सभापती होणार, याकडे आता राज्यचे लक्ष लागले आहे.

MVA and BJP, Shivsena
Uttamrao Jankar on Vijaysingh Mohit-Patil: मोहिते-पाटलांच्या गडाला खिंडार पाडणारे जानकर म्हणतात, मी आमदार होणारच !

राज्यात बाजार समिती ताब्यात ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांविरुद्ध विरोधकांनी मोठी ताकद लावली. त्यात काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी मोठा धक्का देत समान जागा मिळविल्या आहेत. राज्यात अशा बाजार समित्यांची संख्या सहा आहे. त्यात जळगावमधील चोपडा, नाशिकमधील सिन्नर, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड, पुण्यातील दौंड आणि सांगली जिल्ह्यातील आटपाडी बाजार समितीचा समावेश आहे. या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधकांना समान म्हणजे ९-९ असे अशा जागा मिळाल्या आहे. त्यामुळे या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही गटांकडून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यात कुणाची सरशी ठरणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान अनेक ठिकाणी आजी-माजी आमदारांमध्ये चुरस झाल्याने बाजार समितीवरील वर्चस्वाचा संघर्ष शिगेला पोहचला आहे.

MVA and BJP, Shivsena
Beed Bazar Samiti News : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व; धस अन् आडसकरांनी भाजपची लाज राखली

सिन्नरला कोकाटे विरुद्ध वाजे

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी धक्का दिला आहे. या बाजार समितीत दोन्ही गटांना समान जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, या बाजार समितीसाठी आठ सहकारी संस्थांमधील ९६ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. याचा फटका सत्ताधारी राष्ट्रवादीला बसल्याचे बोलले जात आहे. याचा फायदा माजी आमदार राजाभाऊ वाजे गटाला झाला. सध्या या बाजार समितीत दोन्ही गटांचे ९-९ असे संख्याबळ आहे. त्यामुळे सिन्नर बाजार समिती आता कोकाटे-वाजे या आजी-माजी आमदारांपैकी कुणाकडे जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

MVA and BJP, Shivsena
koregaon APMC : शशिकांत शिंदेंचे वर्चस्व कायम; महेश शिंदेंचा दारुण पराभव

चोपडा येथे शिंदे गटाचे वर्चस्व पण…

जळगाव जिल्हातील चोपडा बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत भाजप व शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये अशी थेट लढत झाली. यात एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या नेतृत्वातील पॅनलने नऊ जागा मिळविल्या. तर विरोधातील महाविकास आघाडीच्या पॅनलला पाच जागांवर समाधान मानवे लागले. तर बंडखोर भाजप आणि राष्ट्रवादी प्रणित पॅनलला चार जागांवर विजय मिळाला आहे. आता या बाजार समितीत आमदार सोनवणे यांच्या पॅनलकडे जास्त जागा दिसत असल्या तरी बंडखोरांचा पॅनल कुणाच्या मागे उभा राहतो, यावर येथील सत्तेचे राजकारण यशस्वी होणार आहे. त्यामुळे या बाजार समितीवर कोण सत्ता स्थापन करणार, याकडे लक्ष लागलेले आहे.

MVA and BJP, Shivsena
Khed Bazar Samiti Election : ग्रामपंचायत सदस्याचा बाणेदारपणा : बाजार समिती निवडणुकीत मिळालेली पाकिटे केली परत; पैसे दान केले!

आटपाडीत आगळी आघाडी

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी हातमिळवणी केल्याने चर्चेत राहिली. त्यांना शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसच्या पॅनेलने तगडे आव्हान दिले. त्यामुळे या बाजार समितीत दोन्ही आघाड्यांना १८ पैकी ९-९ अशा जागा मिळाल्या. यात कोणालाही कोणालाही बहुमत नसल्याने सत्तेचा तिढा निर्माण झाला आहे. या बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी आता गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्र देशमुख, राष्ट्रवादीचे नेते हणमंतराव देशमुख विरुद्ध शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे.

MVA and BJP, Shivsena
Ghansawangi APMC Result News : राष्ट्रवादीच्या टोपेंचा विरोधकांना दे धक्का, सर्व जागा जिंकत मारली बाजी..

कर्जत आणि जामखेडला पवार विरुद्ध शिंदे

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत बाजार समिती राज्यात विविध कारणाने चांगलीच गाजली. या निवडणुकीत भाजपचे राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार या दोन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या गटाला समसमान जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे कर्जत बाजार समितीत सभापती कुणाचा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतही कर्जतची पुनरावृत्ती झाली. येथीह राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला ९ तर भाजप पुरस्कृत पॅनललाही ९ जागांवर विजय मिळविला आहे. या निवडणुकीतही मतदारांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने समान कौल दिल्यान सत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आमदार राम शिंदे यांचे कर्जत आणि जामखेड या दोन्ही बाजार समित्यांवर वर्चस्व होते. त्यांच्या या सत्तेला आमदार रोहित पवारांनी सुरूंग लावल्याची चर्चा आहे. आता कर्जत आणि जामखेड बाजार समितींवर कुणचा सभापती बसणार, याकडे राज्य लक्ष देऊन आहे.

MVA and BJP, Shivsena
Ajit Pawar on CM Post : जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचं म्हणणं खरं ठरो ; असं अजितदादा का म्हणाले ; video पाहा

राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात

पुणे जिल्ह्यातील दौंड बाजार समिती अनेक कारणांनी राज्यात चर्चेत राहिली. येथे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांच्याविरुद्ध मोठे आव्हान दिले होते. या बाजार समितीवर सुमारे २० वर्षांपासूनचे थोरातांची एकहाती सत्ता होती. या निवडणुकीत मात्र कुल यांनी नऊ जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचा गड खालसा करण्याचे काम केले. दरम्यान, येथे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सभा झाली होती. त्यांनी कुल यांच्यावर ५०० कोटींच्या मनलाँड्रिंगचे आरोप केले आहेत. आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या गटाला ९-९ अशा जागा मिळाल्याने येथे कोण सत्ता स्थापन करणार, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in