भाजपच्या माजी नगरसेवकाला खंडणी मागणाऱ्यास थेट तेलंगणातून केली अटक

Crime News : पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
crime News Pune
crime News PuneSarkarnama

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) माजी नगरसेवकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास बिबवेवाडी पोलिसांनी तेलंगणातून अटक करण्यात आले आहे. ३ ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

इम्रान समीर शेख (रा. 38, विकासनगर, घोरपडी गाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबा मिसाळ (रा. लष्कर) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (crime News Pune)

crime News Pune
काय सांगता! सरपंचासह ग्रामसेवकही लाच घेताना ACB च्या जाळ्यात...

मिसाळ हे भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचे दीर असून भाजपचे नगरसेवक देखील होते. दीपक मिसाळ यांना 18 ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयातील जनसंपर्कासाठी ठेवलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करुन तसेच मेसेज करुन गुगल पे द्वारे खंडणी मागण्यात आली होती. पैसे न दिल्यास मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यानंतर मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

crime News Pune
पुणे पोलिसांकडून सर्वात मोठे 'लोन ॲप रॅकेट' उध्वस्त!

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत बिबवेवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासामाध्ये संबंधित व्यक्ती हा तेलंगणा राज्यातील कामारेड्डी येथे लपून बसल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने त्याला तेलंगणा येथून ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध चंदन नगर पोलिस ठाण्यातही एक गुन्हा दाखल आहे. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून तो आयटी पार्कमधील एका कॉलसेंटरमध्ये कामाल असल्याची माहिती परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी आज (ता.१ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण काळुखे, शाम लोहोमकर, सतीश मोरे, तानाजी सागर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com