Pune News : लाचेचा नवा पॅटर्न ; थेट फोन पे तून 'हफ्ता' घेतला अन् एसीबीने घेतलं ताब्यात!

Pune News : पुणे युनिटने आता त्यांना या लाच प्रकरणी ताब्यात घेतले आहे.
Bribe Pune
Bribe Pune Sarkarnama

Pune News : रोख पद्धती बरोबरच वस्तूच्या स्वरूपातही लाच घेतल्याच्या घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत. आता मात्र, त्यात 'नव्या पॅटर्न'ची भर पडली आहे. फोन पे व्दारे लाच घेतल्याची अजब घटना आज (ता.१३) पुण्यात घडली. यामुळे आता डिजिटल लाच पद्धत प्रककण पुढे येत आहे. (Latest Marathi News)

Bribe Pune
Uorfi Javed : उर्फीने भेट घेतल्यानंतर काय म्हणाल्या रूपाली चाकणकर?

शिवाजीनगर, पुणे येथील जिल्हा उद्योग केंद्रातील उद्योग निरीक्षक चंद्रभान परशुराम गोहाड (वय ५७) असे डिजिटली फोन पे च्या माध्यमातून लाच घेतल्याचे निरीक्षकाचे नाव आहे. घेणाऱ्या जुन्या वर्ग तीन कर्मचाऱ्याचे नाव आहे. वर्षभरातच ते रिटायर होणार होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे युनिटने आता त्यांना या लाच प्रकरणी ताब्यात घेतले आहे.

Bribe Pune
ST Workers : 'एसटी'साठी ३०० कोटी मंजूर : कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होणार का?

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत तक्रारदार तरुणाने खिळे निर्मिती उद्योगाकरिता पुणे जिल्हा उद्योग केंद्रात अर्ज केला होता.सदरचा प्रस्ताव बॅंकेकडे पाठविण्यासाठी गोहाड यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली. तसेच त्यातील पाचशे रुपयांचा पहिला हफ्ता लगेचच घेतला.

नंतर एक हजार रुपये फोन पे वरून घेतले. तर दोन हजार रुपये घेताना आज त्यांना रंगेहात पकडण्यात आले. एसीबीचे पीआय वीरनाथ माने याप्रकरणी तपास करीत आहेत. दुसरीकडे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in