Bharat Jodo Yatra : राहुल गांधींना बॉम्बने उडवून देऊ; निनावी पत्राने खळबळ

Bharat Jodo Yatra| जुनी इंदोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र सापडले आहे
Bharat Jodo Yatra|
Bharat Jodo Yatra|

Bharat Jodo Yatra पुणे : भारत जोडो यात्रेत दरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारत जोडो यात्रेतच कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना बॉम्बने उडवून देऊ, असे धमकीचे निनावी पत्र पाठवण्यात आले आहे. इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती आहे. या पत्राने एकच खळबळ उडाली आहे.

इंदूरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर जिल्हा आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. जुनी इंदोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र सापडले आहे. पत्र मिळाल्यानंतर इंदूर पोलीस अलर्टवर आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पत्र सोडून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

अज्ञात व्यक्तीने सोडलेले पत्र

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या जुनी भागात असलेल्या एका मिठाईच्या दुकानात अज्ञात व्यक्तीने पत्र टाकले होते. हा प्रकार दुकानमालकाने पाहिल्यानंतर त्यांनी हे पत्र पोलिसांच्या ताब्यात दिले. या पत्रात भारत जोडो यात्रेचा भाग म्हणून राहुल गांधी इंदूरच्या खालसा कॉलेजमध्ये थांबल्यास बॉम्बने स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे.

डीसीपींनी पत्राला दुजोरा दिला

डीसीपी इंटेलिजन्स रजत सकलेचा यांनीही धमकीचे पत्र मिळाल्याची पुष्टी केली आणि ते पत्र उज्जैनमधून आल्याचे सांगितले. किंबहुना या पत्रात एका आमदाराच्या नावाचाही उल्लेख आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in