Pimpri Politcs| लक्ष्मण जगतापांचे एक पत्र आणि आख्खं प्रशासन लागलं कामाला...

MLA Lakshman Jagtap| पन्नास दिवस `आयसीयू` मध्ये जीवघेण्या आजाराचा यशस्वी सामना करून घरी परतलेले आ. जगताप हे पुन्हा सक्रिय झाले आहेत
MLA Lakshman Jagtap|
MLA Lakshman Jagtap|

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्तांची सुरक्षा करणाऱ्या सुरक्षारक्षकांची क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रा. लि. या ठेकेदार कंपनीकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांनी पत्र लिहून महापालिका प्रशासनाला खडसावताच प्रशासन खडबडून जागे झाले. एवढेच नाही, तर त्वरेने कामालाही लागले आहे. दरम्यान, आमदारांच्या पत्रानंतर सुरक्षारक्षकांचा रखडलेला पगार लगेच झाला.

भाजपचे विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड व त्यांचे कुटुंबिय दहा वर्षापूर्वी क्रिस्टल कंपनीवर संचालक होते. सध्याही आ. लाड यांचे पुतणे कंपनी संचालक असल्याची माहिती कंपनीतूनच देण्यात आली. याच कंपनीने शहरातील स्मार्ट सिटीचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट घोटाळा करून घेतले व त्यात आर्थिक अनियमितता केली असा आरोप शिवसेनेने मविआ सरकार असताना केला होता. तत्कालीन नगरविकासमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी या कंपनीविरोधात तक्रारी केल्या होत्या.मात्र,त्यावर अद्याप कारवाई झाली नव्हती.आता,तर भाजप आमदारांकडून या कंपनीवर कामगारांचे आर्थिक शोषण केल्याचा आरोप झाल्याने क्रिस्टल पुन्हा चर्चेत आली आहे.

MLA Lakshman Jagtap|
उपमुख्यमंत्री साहेब, तुम्ही उद्धव साहेबांना नेहमीच ब्लॅकमेल केलं; सुहास कांदे आक्रमक

पन्नास दिवस `आयसीयू` मध्ये जीवघेण्या आजाराचा यशस्वी सामना करून घरी परतलेले आ. जगताप हे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडे क्रिस्टलच्या कामगारांनी तीन महिने पगार झाला नसल्याची तक्रार करताच त्यांनी १२ तारखेला पालिका आयुक्तांना पत्र लिहून जाब विचारला होता. त्यानंतर १८ तारखेला लगेच क्रिस्टलने जुलैचा पगार केला.महापालिकेची विविध कार्यालये, मिळकती, दवाखाने व उद्यानांच्या सुरक्षेचे काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या क्रिस्टल या ठेकेदार कंपनीवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी आ. जगतापांनी केली होती.

तसेच मार्च २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीतील भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कमही `क्रिस्टल` ने सुरक्षारक्षकांच्या खात्यात जमा केले नसल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होते. कंपनी सुरक्षारक्षकांना कामगार कायद्याअंतर्गतचे कोणतेही लाभ देत नाही. नियमानुसार वेतनवाढही करत नाही. कंपनी महापालिकेसोबत झालेल्या करारातील अटींचे कोणत्याही प्रकारचे पालन करत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. संबंधित सुरक्षारक्षक व काही लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात तक्रार करूनही कंपनीचे वरिष्ठ अधिकारी दाद न देता उद्धटपणाने वागणूक देत असल्याचे आमदारांनी म्हटले होते. या आर्थिक पिळवणुकीविरोधात संबंधित सुरक्षारक्षकांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली.काहींनी आंदोलनही केली.तरीही महापालिका प्रशासन दबावापोटी योग्य कार्यवाही करत नसल्याचे सुरक्षारक्षकांचे म्हणणे असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले होते.

MLA Lakshman Jagtap|
शिंदे साहेब...सोडून जाऊ नका, आम्ही उद्धव साहेबांना समजावून सांगतो!

दरम्यान, आमदारांनी गैरसमजातून आरोप केले असून ते चुकीचे आहेत,असा खुलासा `क्रिस्टल`चे विभागीय संचालक रविराज लायगुडे यांनी सरकारनामाशी बोलताना केला.तीन महिने पगार दिला नसल्याच्या आरोपात अजिबात तथ्य नसून दर महिन्याला तो केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. फक्त काही दिवस तो उशीराने होत असल्याची कबुली त्यांनी दिली. कंपनीने कामगारांचे आर्थिक शोषण केल्याचे सिद्ध करून दाखवण्याचे आव्हानही त्यांनी दिले आहे.दरम्यान, आमदारांनीच तक्रार केल्यामुळे त्यांच्या पत्राची पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेतली.सुरक्षा विभागाकडून यासंदर्भात अहवाल, तर `क्रिस्टल`कडून खुलासा मागवला आहे,अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. तो अयोग्य वाटला,तर ठेकेदार कंपनीला दंड केला जाईल,असे पालिकेच्या सुरक्षा विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे याांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com