पुणे पोलिसांची दडपशाही? पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर बरसवल्या काठ्या

Pune | Police | Katraj : उपोषण आणि आंदोलनाला गालबोट
Pune Police
Pune Police Sarkarnama

पुणे : कात्रज चौकातील आंदोलनकर्त्यावर पुणे (Pune) पोलिसांनी (Police) लाठीमार केल्याची घटना समोर येत आहे. कात्रजसह समाविष्ट इतर गावांच्या विविध प्रश्नांसाठी आमरण उपोषण आणि आंदोलन सुरू असताना पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला आहे. तसेच पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर आंदोलनकर्त्यांना हटविले असल्यामुळे या पुढील आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे. या लाठीचार्जमध्ये महिलांसह कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, कात्रज चौकात नमेश बाबर हे मागील काही दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. पुणे महापालिकेत कात्रजचा समावेश होऊन २५ वर्ष उलटली तरी मूलभूत सुविधा व विकास होत नाही, महापालिका प्रशासन व राज्यकर्ते याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत बाबर यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी कात्रजसह, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडीतील नागरिकांकडून बाबर यांच्या उपोषणाला प्रशासनाचा निषेध करत नागरिकांकडून पाठिंबा देण्यात आला.

कात्रज व इतर समाविष्ट गावात पाणीप्रश्न, वाहतुकीची समस्या यासह महापालिकेचा दवाखाना, खेळाची मैदाने, ई-लर्निंग स्कूल, स्वारगेट - कात्रज मेट्रो अशा प्रकल्पाबाबत अन्याय झाल्याची संतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. दरम्यान या आंदोलनकर्त्यांवर आता लाठीचार्ज करण्यात येवून आंदोलन मोडून काढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे आता हे आंदोलन नेमके कोणते वळणं घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com