NCP : राष्ट्रवादी घडवणार गुवाहाटीची मोफत सफर; पण 'ही' असेल अट

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं
NCP :
NCP :

Pune Political News : पुण्यात पुणेरी पाट्यांची जशी चर्चा असते, तशी अलीकडे राज्यातील राजकीय घडामोडींबाबत पुण्यातील फ्लेक्सही कायम चर्चेत असतात. अशातच आता "छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमान करणाऱ्या व्यक्तींना, जो योग्य पद्धतीने धडा शिकवेल, त्या पहिल्या व्यक्तीस मोफत गुवाहाटी ट्रिप (Guwahati) भेट म्हणून दिली जाईल" अशा मजकुराचे फ्लेक्स सध्या पुण्यात (Pune) पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) उभारण्यात आलेल्या फ्लेक्सची चर्चा सुरु आहे.

औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रदान कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. तेव्हापासून राज्यभरात त्यांच्याविरोधात संतापाचे वातावरण आहे. राज्यभरात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले असून त्यांच्याकडून राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता याच मुद्यावरून शहरातील काही भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून काही फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

NCP :
महाराष्ट्र-कर्नाटकनंतर आता नवा सीमावाद ; बुलडाण्यातील चार गावांनी केली मध्यप्रदेशात जाण्याची मागणी

काय लिहलंय या फ्लेक्सवर?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभारण्यात आलेल्या या फ्लेक्सवर, ''जी कोणी पहिली व्यक्ती भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींना योग्य त्या पद्धतीने धडा शिकवेल, त्या पहिल्या व्यक्तीस मोफत गुवाहाटी ट्रिप व कामाख्या देवी दर्शन मिळेल.'' असा मजकूर या फ्लेक्सवर लिहीण्यात आला आहे. तसेच, 'टीप - सदरची घोषणा कुठल्याही पद्धतीने बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देण्याकरता नसून केवळ छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याकरता आहे.'' अशी खाली टीपही दिली आहे.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्यानंतर भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान केलं केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म कोकणात झाला, असे विधान त्यांनी कोकण महोत्सवासाठी आयोजित पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यावरुन लाड यांच्याविरोधातही राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसने ट्वीट करत प्रसाद लाड यांचा हा व्हिडीओ शेअर केला होता. तसेच दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असा टोलाही त्यांनी या ट्विटमध्ये लगावला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com