Pune Crime news: पुण्यात भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याने जीवन संपवलं...

Pune News| वारजे एनडीए रस्त्यावरील एका इमारतीत त्यांचे निवासस्थान होते आणि त्याच इमारतीत त्यांचे कार्यालयही होते.
Pune Crime news:
Pune Crime news:Sarkarnama

Pune Crime News : पुण्यातील वारजे येथील भागीरथीनगर भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपचे माजी पदाधिकारी संजय ज्ञानोबा बराटे (वय ५६) यांनी त्यांच्या कार्यालयात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. (Pune Political news) बराटे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, विवाहित बहिणी असा परिवार आहे.

वारजे एनडीए रस्त्यावरील एका इमारतीत त्यांचे निवासस्थान होते आणि त्याच इमारतीत त्यांचे कार्यालयही होते. शुक्रवारी (२८ एप्रिल) संध्याकाळी त्यांच्या पत्नी कार्यालयात पोहचल्या असता त्यांना ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (BJP Politics)

Pune Crime news:
Buldhana News : काँग्रेसला मोठा धक्का; 'त्या' फुटीर आठ नगरसेवकांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

संजय बराटे हे भाजपचे माजी पदाधिकारी आणि वारजे मारुती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष होते. काही वर्षांपुर्वीच त्यांनी ट्रस्ट सुरू करून गावातील मंदिराचा जीर्णोद्धार केला. या ट्रस्टचे राघवदास विद्यालयाचेही ते सध्या अध्यक्ष होते. तर हवेली तालुक्याचे भाजपचे (BJP) १९९५ मध्ये ते सरचिटणीस होते. (Maharashtra Politics)

त्यांनी त्यांनी २००७ मध्ये महापालिकेची अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती यांनी भाजपच्या तिकीटावर हवेली पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. पण त्यानंतर ते राजकारणात जास्त सक्रिय राहिले नाही.

Pune Crime news:
Barsu Refinery News : बारसू प्रकरणात मुख्यमंत्री, उद्योगमंत्री खोटं बोलतायं ; आंदोलनाचे प्रणेते चव्हाण यांचा दावा

बराटे हे भय्यू महाराज देशमुख यांचेही शिष्य होते. वारजे येथील त्यांच्या इमारतीत सूर्योदय परिवाराचा सत्संग असायचा. अनेकवेळा त्यांच्या या इमारतीत भय्यू महाराज यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com