Maharashtra Kesari 2023 : अवघ्या एकाच मिनिटात स्वप्न केले साकार : शिवराज राक्षे ठरला 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी!

Maharashtra Kesari 2023 : महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा
Maharashtra Kesari 2023
Maharashtra Kesari 2023Sarkarnama

Maharashtra Kesari 2023 : पुण्यात आज (शनिवार) ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला. स्पर्धेतील अंतिम सामन्यात रोमांचकारी निर्णय आला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) या दोन मल्लांमध्ये अंतिम सामन्यात लढत लागली. शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाडला सुरूवातीच्या मिनिटातच चितपट दिमाखात विजय मिळवला.

मूळ नांदेड जिल्ह्यातला शिवराज राक्षे आणि सोलापूर जिल्ह्यातला महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम सामन्यात झालेल्या लढतीत शिवराज राक्षेने अवघ्या सुरूवातीच्या एका मिनिटामध्येच महेंद्रला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’चा दिमाखात किताब मिळवत, मानाच्या चांदीच्या गदावर नाव कोरले. शिवराजने महाराष्ट्र केसरीचा माजी विजेता हर्षवर्धनला याला ८-१ अशा मोठ्या फरकाने पराभूत करत, अंतिम सामना गाठलं. तर दुसरीकजे महेंद्र गायकवाडने वाशिमच्या सिकंदर शेख या मल्लाला ६-४ अशी मात केली होती.

Maharashtra Kesari 2023
Devendra Fadnavis : सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार ब्रिजभूषण सिंह, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. अंतिम सामन्यात प्रवेश केलेले राक्षे आणि गायकवाड हे पुण्यातील एकाच तालमीत तयार झालेले मल्ल आहेत. वस्ताद काका पवार व गोविंद पवार यांच्या पुण्यातल्या कात्रजमधील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीतले हे कुस्तीपटू आहेत.

Maharashtra Kesari 2023
Devendra Fadnavis : पुण्यासाठी 2 हजार कोटींचा निधी : फडणवीसांची घोषणा!

महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवलेल्या शिवराज राक्षे याला चांदीची गदा, रोख पाच लाख रुपये आणि महिंद्रा थार ही गाडी बक्षीस म्हणून मिळाली आहे. तर, उपविजेत्या महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपये बक्षीस मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in