Pune News : चर्चा तर होणारच! काँग्रेस नेत्यानं लिहिलं थेट चंद्रकांतदादांना पत्र; काय आहे कारण ?

Political News : चंद्रकांतदादा, आपण पालकमंत्री असून आपण पुणेकरांना वाचवायला हवं....
Chandrakant Patil
Chandrakant Patilsarkarnama

Congress Leader Sanjay Balgude Letter to Chandrakant Patil : महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर नेहमीच हल्लाबोल केला जात आहे. कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीदरम्यान तर आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. मात्र, आता काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यानं चक्क पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच पत्र लिहिलं आहे. हे पत्र राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

पुणेकरांना स्वतः च्या मालकीच्या घराच्या घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत मिळत होती. ही सवलत आता रद्द करण्यात आल्याच्या पुणेकरांना नोटीसा आल्या आहेत. या निर्णयाविरोधात पुण्यातील काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे(Sanjay Balgude) यांनी भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात बालगुडे यांनी दादा, पुणेकरांना वाचवा असं आवाहन केलं आहे.

Chandrakant Patil
Pradnya Satav Attack Update: प्रज्ञा सातव हल्ला प्रकरणी नवी अपडेट; पोलीस अधीक्षकांनी सांगितलं हल्लेखोराचं सत्य...

पुणे महानगरपालिके(PMC) मध्ये आपली सत्ता असताना वसूली व व्याज घेण्यावर स्थगिती दयावी असा ठराव करून सरकारकडे पाठविण्यात आला. याबाबत आपण पुन्हा मंत्री झाल्यावर आपल्याला याबाबत विचारले असता, या वसुलीच्या अध्यादेशाला स्थगिती देऊन पुणेकरांना दिलासा देऊ असं जाहीर सांगितलं होतं. पण अद्याप याबाबत शुध्दी पत्रक शासनानं पाठवलेलं नाही असे मनपा आयुक्तांनी कळवले आहे असंही बालगुडे यांनी सांगितलं आहे.

पत्रात काय आहे ?

पुण्यातील नागरिकांना 1970 सालापासून स्वतः च्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत मिळत होती. 2011 मध्ये महालेखा परिक्षकांनी याबाबत नोंदवला होता. पुणे महापालिकेच्या गेल्या 30 वर्षांपासून असलेल्या अनेक निर्णयांबाबतही आक्षेप नोंदवला होता. याचाच आधार घेऊन 2018 मध्ये तुमचे सरकार असताना व तत्कालीन मुख्यमंत्र्याच्याकडे नगर विकास खाते असताना एक अध्यादेश काढण्यात आला.

Chandrakant Patil
Devendra Fadnavis : बदला घेण्याबाबत देवेंद्र फडणवीसांचे पुन्हा मोठे विधान...

या अध्यादेशानुसार 1900 सालापासून पुणेकरांना मिळणारी घरपट्टीतील सवलत रद्द करण्या आली आहे. केवळ सवलतच रद्द केली नाही तर 1300 सालापासून सन 2018 पर्यंत मिळालेली सवलत व्याजासहित पुणेकरांकडून वसूल करा असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आपण वारंवार आश्वासन देऊन ही आता पुणेकरांना नोटीस येऊ लागल्या आहेत. 40 टक्के सवलत पुणेकरांना मिळाली पाहिजे.

सध्या पुणेकर नागरिकांना सन 2018 पासून 40 टक्के सवलत रद्द धरून थकीत रक्कम व्याजासहित भरावी अशा नोटीसा व संदेश मोबाईलवर येत जाहेत. सामान्य पुणेकर हा घरपट्टीच्या ओझ्याखाली दबून गेला आहे. चंद्रकांतदादा(Chandrakant Patil), आपण पालकमंत्री असून आपण पुणेकरांना वाचवायला हवं असं काँग्रेस नेते संजय बालगुडे पत्रात म्हणाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com