लाल महालात रिल्सचं शुटींग महागात: चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Lal Mahal|Sambhaji Brigade | लाल महालात तमाशातील गाण्यांवर मुलींना नाचवून महाल बदनाम करण्याच प्रयत्न केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
Lal Mahal|Sambhaji Brigade |
Lal Mahal|Sambhaji Brigade |

Pune Crime News

पुणे : लाल महालात रिल्सच्या निमित्ताने चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर आधारित शुटींग करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. संभाजी ब्रिगेडसह काही पुरोगामी संघटनांनी यावर आक्षेप घेतलाअसून रिल्सचे शुटींग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणी पुण्यातील फरासखाना पोलिसांनी लाल महालात नृत्य करणाऱ्या 'मानसी पाटील सह कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. चार दिवसापूर्वी वैष्णवी पाटील आणि तिच्या साथीदारांनी लाल महालातील मोकळ्या जागेत नृत्य करत शूटिंग करून व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केले होते. वैष्णवीचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमातून त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. संभाजी ब्रिगेड सह पुरोगामी संघटनेने या प्रकरणी आक्रमक होत आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे.

Lal Mahal|Sambhaji Brigade |
लाल महालातील नाचगाणी आणि रिल्सविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक; कारवाईची मागणी

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. ''वैष्णवी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणं त्या ठिकाणी लाल महालात शूट केले. जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा,'' अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी केली होती.

जिजाऊ-शिवरायांची अस्मिता म्हणजे तो लाल महाल आहे. हजारो शिवप्रेमी लाल महालात जाऊन नतमस्तक होत असतात. त्याच ठिकाणी लाल महाल बंद असताना चित्रपटाची घाणेरडी गाणी चित्रीत करून लाल महाल बदनाम केला जात आहे. ज्या जिजाऊ-शिवरायांनी सोन्याचा नांगर चालून हे पुणे वसवलं, त्याच जिजाऊंच्या लाल महालामध्ये अशा पद्धतीची गाणी चित्रित करणं हे निषेधार्ह आहे. हा लाल महालाचा अवमान असल्याचं संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

- लाल महालाचा सुरक्षा रक्षक निलंबित

दरम्यान, कुलदीप बापट यांनी या रिल्सचे चित्रीकरण केले असून त्यात वैष्णवी पाटील यांनी नृत्य केलं आहे. पण परवानगी नसताना ही कलावंतांना शूटिंगसाठी कोणी प्रवेश दिला आणि कसा दिला, लाल महालाबाहेर महापालिका सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले का नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या व्हिडिओ प्रकरणी पुणे पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीची गंभीर दखल घेत महालाच्या सुरक्षा रक्षाला निलंबित करण्यात आले आहे. सुरक्षा रक्षकाला विचारले असता त्याने एका वरिष्ठ नेत्याची परवानगी होती महणून आत सोडल्याचं म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com