बोम्मईंचा सोलापूरवर दावा; आंदोलन करत, दौंड-कर्नाटकच्या बसला काळे फासणाऱ्यावर गुन्हा दाखल

Maharashtra-Karnataka News : बसला काळे फासल्यामुळे फासल्यामुळे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra-Karnataka News
Maharashtra-Karnataka NewsSarkarnama

दौंड : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्या निषेधार्थ दौंड शहरात कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसला काळे फासणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगण्याचा विचार कर्नाटक सरकार करीत असल्याचे विधान केल्याने कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध करण्यात आला होता.

दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. दौंड-कुरकुंभ महामार्गावरील गोल राउंड येथे २४ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दौंड शहरातून जाणारी निप्पाणी-औरंगाबाद ही बस रोखण्यात आली होती. बसला काळे फासून त्यावर निषेधाचे वाक्य लिहिण्यात आले होते.

Maharashtra-Karnataka News
Uddhav Thackeray : ठाकरेंनी भरसभेत 'तो' ऑडिओ ऐकवला, फडणवीसांच्या 'त्या' मागणीची केली पोलखोल

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील गावांसह सोलापूर व अक्कलकोट वर दावा सांगण्याचा विचार कर्नाटक सरकार करत असल्याचे विधान त्या राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केल्याने त्यांच्याविरूध्द घोषणा देत निषेध करण्यात आला. सदर बस रोखून धरण्यात आल्याने मनमाड-दौंड-बारामती-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक १५ मिनिटांसाठी विस्कळित झाली होती.

Maharashtra-Karnataka News
बारणे अन् आढळरावांची मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याला दांडी; दोघांनीही दिले 'हे' कारण

पोलिस हवालदार पांडुरंग थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी विक्रम पवार, शैलेंद्र पवार, दादा नांदखिले, आदिनाथ थोरात, रोहन घोरफडे, विकास जगदाळे व इतर पाच ते सहा जण (सर्व रा. दौंड) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी आदेशाचे उल्ंलघन करणे, बेकायदा जमाव जमविणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे, आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com